Excessive Use Of Garlic:तुम्ही भाजीत जास्त प्रमाणात लसूण वापरताय? आरोग्यावर होईल ‘असा’ परिणाम

Excessive Use Of Garlic:तुम्ही भाजीत जास्त प्रमाणात लसूण वापरताय? आरोग्यावर होईल ‘असा’ परिणाम

Rate this post

Excessive Use Of Garlic: भारतातील स्वयंपाकघर असो किंवा जगातील कोणतेही स्वयंपाकघर (Kitchen), लसूण हा सर्वात जास्त वापरला जाणारा घटक आहे. कोणत्याही रेसिपीमध्ये लसूण (Garlic) मिसळले तर खाद्य पदार्थाची लज्जत वाढते. यासोबतच लसूण आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. तर, काही लोक लसणाच्या तीव्र वासामुळे त्याचा अन्नात जास्त वापर करत नाहीत. लसणामध्ये व्हिटॅमिन बी 1 (Vitamin B 1), कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोहासह अनेक पोषक घटक असतात. इतकी फायदेशीर गोष्ट असूनही लसूण खाण्याचे अनेक तोटे आहेत. म्हणूनच त्याचं नेहमी मर्यादित प्रमाणात सेवन करावं.

Also Read  गर्भवती महिलांनी लसीकरण करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

विशेषत: भारतात काही घरांमध्ये भाजी बनवताना आणि इतर पदार्थांमध्येही लसूण जास्त प्रमाणात वापरला जातो. पण लसूण हा गरम स्वरुपाचा आहे. त्यात, भाज्यांमध्ये खूप मसाले (Spices) देखील टाकले जातात. अशा स्थितीत हे सर्व मिसळून पोटात काय होत असेल? याचा अंदाज तुम्ही लावू शकता. भाजीमध्ये लसणाच्या कळ्या अनेकदा वापरताना विशेष लक्ष द्या. जेणेकरून लसूण जास्त प्रमाणात पडणार नाही.

आपण जास्त लसूण का खाऊ नये?

लसूण हा आयुर्वेदाच्यादृष्टीने महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक असतो. अधिक प्रमाणात लसूण खाल्ल्याने शरीराला त्रास उद्भवू शकतो.

Also Read  Paneer Side Effects: पनीर खाण्याचे फायदे अनेक, दुष्परिणामही तितकेच

तोंडाला दुर्गंधी येणे

लसणाचा प्रभाव हा गरम असतो, म्हणूनच लोक सर्दी आणि खोकला झाला असताना त्याच्या कळ्या चघळतात. पण काही लोक जास्तच लसूण खातात त्यामुळे तोंडात दुर्गंधी येऊ लागते. लसूण मर्यादित प्रमाणात खाल्ला पाहिजे. अन्यथा विविध समस्या भेडसावू शकतात. जास्त लसूण खाल्ल्यास पोटात गरम पडू शकते.

रक्तदाब कमी होणे (Low Blood Pressure)

ज्यांना रक्तदाबाचा (Low Blood Pressure) आजार आहे, त्यांनी लसूण खाऊ नये.  कमी रक्तदाब (Low Blood Pressure) म्हणजेच हायपोटेन्शनची तक्रार असू शकते. त्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा येऊ लागतो. त्यामुळे लसूण खाणे थोडे टाळा.

Also Read  Sunburn Remedies : उन्हामुळे झालेला सनबर्न घालवायचाय? स्किन टॅनिंग घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

छातीत जळजळ

लसूण जास्त खाल्ल्यास छातीत जळजळ होण्याची तक्रार वाढू शकते. लसणात अ‍ॅसिडीक कंपाऊंड खूप जास्त असतात. याचे अधिक सेवन केल्याने छातीत जळजळ होते. कधीकधी ते सहनशक्तीच्या बाहेर देखील जाऊ शकते. त्यामुळे जेवणात लसूण वापरताना नेहमी काळजी घ्या.

महत्त्वाच्या बातम्या: 

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज

1 thought on “Excessive Use Of Garlic:तुम्ही भाजीत जास्त प्रमाणात लसूण वापरताय? आरोग्यावर होईल ‘असा’ परिणाम”

  1. Pingback: Citroen C3 Aircross Hyundai Creta: की Kia Seltos? तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट? वाचा सविस्तर... - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?