पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटर वापरण्याचे फायदे

पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटर वापरण्याचे फायदे

Rate this post

पर्सनल लोनची निवड करणे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे सोपे असले तरी तुम्ही किती कर्ज घ्यायला हवे आणि किती काळासाठी हे फार किचकट आणि महत्त्वाचे आहे. अचूक माहिती मिळवणे पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटरमुळे सोपे होते. तुमचे EMI कळल्यावर तुमच्या परफेडीच्या क्षमतेनुसार तुम्हाला दीर्घ मुदतीचे किंवा कमी रकमेचे लोन घेण्याचा निर्णय घेण्यास मदत होते. तुम्ही निवडलेले EMI तुमच्या आर्थिक स्थितीवर बोजा टाकत नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची परफेड किती असेल हे समजून घेण्यासाठी पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटरचा वापर करा.

ते कसे मदतीचे आणि का महत्त्वाचे आहे याविषयी अधिक

पर्सनल EMI कॅलक्युलेटरचा काय उपयोग आहे?

EMI कॅलक्युलेटर (EMI Calculator) क्लिष्ट गणना व गणिते करते आणि सेकंदांमध्ये तुम्हाला अचूक उत्तर देते. पर्सनल लोनवरील EMI काढण्यासाठीचे सूत्र आहे EMI = [P x R x (1+R)N]/[(1+R)N- 1]. येथे P म्हणजे प्रिन्सिपल अर्थात मुद्दल, R म्हणजे व्याजदर आणि N म्हणजे अवधी (महिन्यांमध्ये). हे ऑनलाईन उपलब्ध असल्याने तुम्ही पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटर हवे तेव्हा व हवे तिथे
वापरू शकता. शेवटी, तुम्हाला जोपर्यंत तुमची परतफेडीची इष्टतम रक्कम आणि अवधी मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळी संयोजने वापरुन पाहण्याची मुभा देत EMI कॅलक्युलेटर तुम्हाला लोनची योग्य रक्कम निवडण्यास मदत करते.
लोन मिळण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटर तुम्हाला कशी मदत करू शकते त्याची ही तपशीलवार माहिती.

Also Read  Job Majha : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था ते अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे नोकरीच्या संधी

तुम्हाला मासिक आर्थिक नियोजन (बजेट) करण्यास मदत करते

EMI कॅलक्युलेटर वापरुन तुम्ही तुमच्या मासिक पेमेंटचा अंदाज लावू शकता, मासिक बजेट तयार करू शकता आणि EMIसाठी तुमचे किती उत्पन्न खर्च होते याचे विश्लेषण करू शकता. परिणामी, तुम्ही उत्पन्न-खर्चाचे प्रमाण समायोजित करू शकता, तुमचे बजेट बदलू शकता किंवा अनावश्यक खर्च कमी करू शकता जेणेकरून दैनंदिन खर्चासाठी रोख रक्कम हातात ठेवताना तुम्हाला EMI परवडेल.

किती लोन घ्यायचे याचा आकडा काढण्यास मदत करते

EMI कॅलक्युलेटरमध्ये लोनचा कालावधी, लोनची रक्कम आणि व्याजदर यासारखे अनेक मापदंड असतात. लोनच्या वेगवेगळ्या रकमा आणि व्याजदरांसाठी EMI कसे बदलतात हे पाहण्यासाठी तुम्ही प्रत्येक मापदंडाचा आकडा बदलू शकता. हे तुमच्या आर्थिक
स्थितीवर ताण न पडू देता तुम्ही किती परतफेड करू शकता हे शोधण्यास मदत करते.

Also Read  Team of the Week: ऋतुराजची सलामी अन् मार्क वूडचा भेदक मारा, या आठवड्यात 11 खेळाडूंनी मारली बाजी

परतफेडीच्या प्रवासाचे नियोजन करण्यास तुम्हाला मदत करते

 जेव्हा तुम्ही तुमच्या EMIची आगाऊ गणना करता तेव्हा तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची व्यवस्थित कल्पना असते आणि त्यानुसार तुमची मासिक बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन तुम्ही करू शकता. शिवाय, EMIची रक्कम कळल्यास लोनच्या अटी जाचक किंवा ओझे देणार्‍या वाटत असतील तर तुम्ही त्या बदलू शकता. दुसरीकडे, तुमच्या परतफेडीसाठी आगाऊ पैसे बचत करण्याची योजनाही तयार करू शकता.

 सोयीचा परतफेड कालावधी ठरवण्यास मदत करते 

पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटरच्या (Personal Loan EMI Calculator) मदतीने, वेगवेगळ्या कालावधीचा तुमच्या EMIवर काय परिणाम होऊ शकतो हे तुम्ही समजून घेऊ शकता. दीर्घ कालावधी असल्यास तुमचे EMI कमी असू शकतात आणि परतफेड करणे
सोपे. दुसरीकडे, कालावधी कमी असल्यास तुम्ही लोन लवकर फेडू शकता पण तुमचे मासिक पेमेंट जास्त असेल. कमी कालावधी निवडल्यास तुम्हाला व्याजावर कमी खर्च करावा लगतो. विविध गणनांच्या आधारे तुम्ही लोनची रक्कम आणि अवधी यावर विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता.

आता तुम्हाला माहिती आहे की पर्सनल लोन EMI कॅलक्युलेटर तुम्हाला तुमच्या परतफेडीच्या प्रवासात कशी मदत करू शकते, तुमच्या आर्थिक स्थितीला फटका बसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. मात्र, लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी लोन प्रक्रियेसाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची माहीती असल्याची खात्री करून घ्या. अर्ज करण्यापूर्वी तुमचे लोन आणि EMIचे नियोजन करण्यासाठी बजाज फिनसर्व्ह EMI कॅलक्युलेटर वापरा. तुम्हाला 84 महिन्यांचा लवचिक कालावधी असलेले
रु. 40 लाखांपर्यंतचे बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनही मिळू शकते. आजच तुमची ऑफर पहा आणि तुमचे आर्थिक ध्येय प्रभावीपणेसाध्य करण्यासाठी आवश्यक निधी मिळवा.

Also Read  Health Tips दम्याची लक्षणं जाणवतायत? काळजी करू नका; 'हे' उपचार जाणून घ्या

( Disclaimer – This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?