Krishnamachari Srikkanth on Dhoni in IPL : सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीला नंबर वन फिनिशर समजलं जातं. यामुळे चाहते धोनीचं कौतुक करताना थकत नाहीत. पण टीम इंडियाचा माजी कर्णधाराने (Former Indian Captain) धोनीवर (MS Dhoni) टीकास्त्र डागलं आहे. धोनी ओवररेटेड फिनिशर असल्याचं मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी व्यक्त केलं आहे.
टीम इंडियाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीच्या खेळीवर निशाणा साधला आहे. त्यांनी धोनी सर्वोत्तम फिनिशर असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं आहे की, ”धोनी ओवररेटेड फिनिशर आहे. आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या बॉलर विरोधात तो सामना जिंकू शकला नाही.”
कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीची तुलना हैदराबादचा युवा फलंदाज अब्दुल समदशी केली आहे. धोनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रीकांत यांनी म्हटलं की, “लिलावात न विकल्या गेलेल्या संदीप शर्माविरुद्धचा सामना धोनी पूर्ण करू शकला नाही. पण अब्दुल समदने संदीप शर्माविरुद्ध फलंदाजी करताना सामना संपवला. धोनी खूप ओव्हररेट फिनिशर आहे.”
आयपीएल 2023 च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये सामना झाला होता. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नईला शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती. पहिल्या तीन चेंडूंवर 14 धावाही झाल्या. मात्र शेवटच्या तीन चेंडूंवर धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही. संदीप शर्माच्या चेंडूंवर धोनीच्या बॅटला सात धावा काढता आल्या नाहीत. परिणामी राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा पराभव केला.
पण अब्दुल समदसमोर संदीप शर्माची गोलंदाजी फिकी पडली. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावा हव्या होत्या. संदीप शर्माने केवळ यॉर्कर लेन्थवर चेंडू टाकला. समदने हा चेंडू थेट सीमापार पाठवत षटकार ठोकला आणि संदीप शर्मा या सामन्यात खलनायक बनला. दरम्यान, या सामन्यावरून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीच्या सर्वोत्तम फिनिशर असण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Tushar Deshpande : धोनी पुढे नवं आव्हान! दणादण विकेट्स तरी प्रतिस्पर्धी संघाकडून धावांचा पाऊस, तुषार देशपांडेच्या गोलंदाजीनं चेन्नईची चिंतेत
Check Your Internet speed Check Now
freelancing साईटवरून पैसे कमवण्याच्या विविध पद्धती
Pingback: IPL 2023 KKR vs SRH:उत्कंठावर्धक! पुन्हा अखेरच्या दोन षटकाचा थरार, रिंकू अन् अर्शदीपची जुगलबंदी - आपला अभ्या
Pingback: वर्षभरात मद्याच्या दरात वाढ, तरीही तळीरामांनी एका वर्षात 5 अब्ज 'खंबे' रिचवले - आपला अभ्यास- Aplaabhy