CSK vs MI, IPL 2023 :  चेन्नईचा मुंबईवर 6 विकटने विजय, नेहाल वढेराची झुंज व्यर्थ

CSK vs MI, IPL 2023 :  चेन्नईचा मुंबईवर 6 विकटने विजय, नेहाल वढेराची झुंज व्यर्थ

Rate this post

CSK vs MI, IPL 2023 :  चेन्नईने मुंबईचा सहा विकेटने पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबईने दिलेले 140 धावांचे आव्हान चेन्नईने १४ चेंडू आणि सहा विकेट राखून सहज पार केले. चेन्नईकडून कॉनवे याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. मुंबईच्या नेहाल वढेरा याची अर्धशतकी झुंज व्यर्थ गेली. चेन्नईने यंदा मुंबईचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. वानखेडे मैदानावर आणि चेपॉक स्टेडिअमवर चेन्नईने बाजी मारली आहे.

मुंबईने दिलेल्या १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी चार षटकात ४६ धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाड याने १६ चेंडूत ३० धावांचे योगदान दिलेय. यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि डेवेन कॉनवे यांनी डाव सावरला. अजिंक्य रहाणे याला चावलाने बाद केले. अजिंक्य रहाणे याने १७ चेंडूत २१ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. 

Also Read  IPL 2023, MI vs RCB: वानखेडेवर सूर्या तळपळला, मुंबईचा आरसीबीवर सहा विकेटने विजय

अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर अनुभवी अंबाती रायडूने कॉनवेला साथ दिली. पण स्टब्सच्या गोलंदाजीवर रायडू बाद झाला. अंबाती रायडूने ११ चेंडूत १२ धावांची खेळी केली. या खेळी त्याने एक षटकार लगावले. रायडू बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि डेवेन कॉनवे यांनी चेन्नईची धावसंख्या वाढवली. अखेरीस मधवाल याने कॉनवेला बाद करत चेन्नईला चौथा धक्का दिला. डेवेन कॉनवे याने संयमी फलंदाजी करत चेन्नईची धावसंख्या हालती ठेवली. कॉनवेने ४२ चेंडूत चार चौकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. अखेरीस शिवम दुबे याने धोनीच्या साथीने चेन्नईला विजय मिळवून दिला. शिवम दुबे याने तीन षटकारांसह नाबाद २६ धावांची खेळी केली. धोनी दोन धावांवर नाबाद राहिला.

पीयूष चावलाचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. पीयूष चावलाने चार षटकार २५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. स्ट्रिस्टन स्टब्स आणि मधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबईच्या इतर गोलंदाजाला विकेट घेण्यात अपयश आले.

मुंबईची फलंदाजी ढेपाळली, वढेराची एकाकी झुंज

चेन्नईच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईने निर्धारित २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १३९ धावांपर्यंत मजल मारली. पथिराणा याने चेन्नईकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मुंबईच्या फंलदाजांनी ठरावीक अंताराने विकेट फेकल्या. नेहाल वढेराचे अर्धशतक वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

Also Read  RCB vs MI, IPL 2023 Match 54 :रोहित पराभवाचा वचपा काढणार की कोहली बाजी मारणार? वानखेडे स्टेडिअमवर रंगणार सामना

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर धोनीने नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.  चेन्नईच्या गोलंदाजांनी धोनीचा हा निर्णय सार्थ ठरवला. पावरप्लेमध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. पहिल्या चेंडूपासूनच चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. मुंबईकडून सलामीला ईशान किशन सोबत कॅमरुन ग्रीन मैदानात आला होता. पण मुंबईचा हा डाव अपयशी ठरला. कॅमरुन ग्रीनला तुषार देशपांडे याने त्रिफाळाचीत केले. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. दीपक चहरच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. ईशान किशनही सात धावा काढून बाद झाला. पावरप्लेमध्ये मुंबईने तीन महत्वाच्या विकेट गमावत फक्त ३४ धावा केल्या होत्या. 

आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण २६ धावांवर सूर्यकुमार यादव बाद झाला. जाडेजाने सूर्याला तंबूत पाठवले. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला नेहाल वढेरा याने दमदार फलंदाजी केली. नेहाल वढेरा याने अर्धशतकी खेळी केली. वढेरा याने ५१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि आठ चौकार लगावले. नेहाल वढेराचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला तीस धावसंख्या गाठता आली नाही. टिम डेविड दोन धावांवर तंबूत परतला. अर्शद खान एका धाव काढून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्स याने २१ चेंडूत २० धावा केल्या. मुंबईकडून फक्त एकमेव षटकार मारता आलाय.

Also Read  तु्म्हाला स्मार्टफोनचं व्यसन लागलं असेल, तर तुम्ही NoMoPhobia आजराने ग्रस्त आहात

चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच भेदक मारा केला. मुंबईच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद करत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. मुंबईच्या फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करु दिली नाही. चेन्नईकडून पथीराणा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. चार षटकार पथीराणा याने फक्त १५ धावा खर्च केल्या. दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा याने एक विकेट घेतली. तुषार देशपांडे याने पुन्हा एकदा पर्पल कॅपवर नाव कोरलेय. 

2 thoughts on “CSK vs MI, IPL 2023 :  चेन्नईचा मुंबईवर 6 विकटने विजय, नेहाल वढेराची झुंज व्यर्थ”

  1. Pingback: Petrol Pump Tips:पेट्रोल पंपावर तुम्ही 'या' सुविधांचा घेऊ शकता मोफत लाभ; तुम्हाला याबद्दल माहितीये का? -

  2. Pingback: RR vs SRH, IPL 2023 : थरार...! अखेरच्या चेंडूवर षटकार, हैदराबादचा राजस्थानवर 4 विकेटने विजय - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?