Corona virus in India : साधारण गेल्या साडे तीन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारीचा ( corona virus) सामना करत आहे. यामुळे संपूर्ण जगातील आरोग्य व्यवस्थाच नव्हे तर आर्थिक स्वरूपातही मोठे नुकसान केलं आहे. या व्हायरसच्या कचाट्यात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याबाबत अजूनही नेमका डेटा उपलब्ध होऊ शकला नाही. पण व्हायरसचा पूर्ण नायनाट कधी होईल? याची अजून लोक वाट पाहात आहेत. याबाबत आरोग्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी (ICMR) एक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, कोराना व्हायरस पूर्ण कधीच संपणार नसून कमी जास्त प्रमाणात तो अस्तित्वात राहिल. सध्या तरी कोरोनाचा एकदमच नायनाट होईल, असा तर्क लावणे कठीण आहे.
या व्हायरसच्या संपण्याबाबत वैद्यकीय तत्ज्ञांचं काय म्हणणं आहे?
देशातून कोरोना महामारी पूर्णत: संपणार नाही. पण एका काळानंतर एन्फ्लुंएजा व्हायरससारखा रूप धारण करेल. एका ठराविक काळानंतर तो एंडेमिक स्टेजपर्यंत पोहोचू शकेल पण या महामारीचा पूर्ण नायनाट होईल, अशी कोणतीही शक्यता नाही. जसे की, दरवर्षीसारखं एन्फ्लूंएजा व्हायरसचा संसर्ग कमी जास्त प्रमाणात होत असतो. यासारखंच कोरोना व्हायरसचे कमी जास्त केसेस येत राहतील. एक वेळ अशी होती की, एन्फ्लूंएजा व्हायरस महामारीचं स्वरूप धारण केलं होतं. पण आज हा व्हायरस एंडेमिक स्टेजला आहे. अर्थात, हा अजूनही कमी-जास्त स्वरूपात लोकांमध्ये अस्तित्वात आहे. असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)मधील वरिष्ठ डॉ. समिरन पांडा (samiran panda) यांनी इंडिया डॉट कॉम या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
एन्फ्लुंएजासारखीच राहिल कोरानाचा स्थिती
एकदा व्हायरस एंडेमिक स्टेजला पोहोचल्यानंतर यासाठी दरवर्षी लसीकरण करण्याची आवश्यकता असते. सध्या कोरोना व्हायरस एंडेमिक स्टेजला आहे. हा दरवर्षी कमी-जास्त स्वरूपात येत राहिल. परंतु, हायरिस्क गटात मोडणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांनी वर्षातून एकदा लसीकरण (फ्लू शॉट) करून घेण्याची आवश्यकता आहे. जसे की, ज्याप्रमाणे दरवर्षी एन्फ्लुंएजाचा संसर्ग वाढल्यामुळे लोकांना दरवर्षी फ्लू शॉट दिलं जात. त्यामुळे या व्हायरसची लागण झाली म्हणून घाबरुन जाऊ नये. या व्हायरसच्या बदललेल्या स्वरूपानुसार लसीमध्येही बदल केला जातो, असं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (Covid-19) आकडेवारीत झपाट्यानं वाढ होत आहे. गरज असेल तिथे मास्कचा वापर करा, विशेष करून गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये, जिथे इन्फेक्शनचा धोका असतो, तिथे मास्क जर लावला पाहिजे असे देखील सूचना दिल्या आहेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator