Benefits of Soaked Chickpeas : भिजवलेले चणे रोज खाणं ठरू शकतं फायदेशीर

Benefits of Soaked Chickpeas : भिजवलेले चणे रोज खाणं ठरू शकतं फायदेशीर

Rate this post


Benefits of Soaked Chickpeas: आपल्या आरोग्यासाठी अनेक गोष्टी या फायदेशीर असतात त्यातून तुम्ही सकाळी उठल्यावरही (Soaked Chickpeas benefits eating in morning) अनेक आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करू शकता. त्यातील एक आहेत ते म्हणजे भिजवलेले चणे. चण्यांचा आपल्या आरोग्यासाठीही चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तुम्हीही जर का रोज सकाळी भिजवलेल्या चण्यांचे सेवन केलेत तर तुम्हाला त्याचा फायदा हा नक्की होऊ शकतो. भिजवलेल्या चण्यांमध्ये चांगली पोषक तत्वे (Healthy Benefits of Channa) असतात. ज्याचा फायदा तुम्हालाही होईल. त्याचसोबत यात असे अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे डायझेशनचीही कोणती समस्या उद्भवत नाही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की भिजवलेल्या चण्याचे नक्की फायदे काय आहेत? 

Also Read  गर्भवती महिलांनी लसीकरण करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

आपल्या सर्वांचेच आयुष्य हे सध्या फारच धकाधकीचे झाले असल्यानं आपल्याला आपल्या आहारातही योग्य ते बदल करू घेणे आवश्यक आहे. आपण सकाळी नाश्त्याला कोणते पदार्थ खातो याकडेही लक्ष देणे फारच महत्त्वाचे आहे. तेव्हा आपल्यालाही आपल्या ब्रेकफास्टमध्ये (Soaked Channa in Breakfast) आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. सोबतच तुम्हीही पचनाला योग्य आणि पोटाला आराम मिळेल अशा पदार्थांचे सेवन सकाळच्या नाश्त्यामध्ये करू घेऊ शकता. 

तुम्ही विविध प्रकारे हे भिजवलेले चणे खाऊ शकता. यामध्ये दोन प्रकार असतात ते म्हणजे एक काळे चणे आणि दुसरे पांढरे चणे. पांढऱ्या चण्यांपासून तुम्हीही छोल्यांसारखे प्रकार तयार करू शकतात. तेव्हा जाणून घेऊया की नक्की काय चण्यांचे फायदे काय आहेत

Also Read  Whatsapp : जाणून घ्या एकाच क्रमांकावर दोन फोनवर Whatsapp  कसे वापरावे ?

जाणून घ्या काय आहेत फायदे? 

  • भिजवलेले चणे रोज सकाळी खल्यानंतर तुमच्या शरीरात होतील हे बदल?
  • तुमच्या हृदयासाठी भिजवलेले चणे हे फायदेशीर ठरू शकतात. चण्यांमध्ये एन्टी ऑक्सिडंट्स एन्थोसायनिन आणि फायटोन्यूट्रियंट्स असतात. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांना त्याचा फायदा होतो. 
  • भिजवलेले चणे हे आपल्या पचनक्रियेसाठीही चांगले असतात. त्यातून आपल्याला आपली पाचनसंस्था सुधारण्यास मदत होते. यामध्ये फायबर असते. तुमचे शरीर हे डिटॉक्स होण्यास मदत होते. तुम्हाला यानं गॅस आणि इतर पोटाचे विकार होत नाहीत. 
  • वजन कमी होण्यासाठीही भिजवलेले चणे हे फायदेशीर असतात. तेव्हा तुम्हीही भिजवलेले चणे खाऊ शकता. 
  • कॉलेस्ट्रॉलही कमी होण्यास यातून मदत होते. तुमच्या रक्तासाठीही भिजवलेले चणे हे फायदेशीर ठरले. 
Also Read  Share Market Opening on 4 May:सेन्सेक्स-निफ्टीची स्थिर सुरुवात; आयटी शेअर्समध्ये घसरण सुरूच

कोणते गुणधर्म असतात? 

प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, कॉपर, व्हिटॅमिन बी 3, सोडियम आणि आयरन असे अनेक गुणधर्म असतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?