अॅपल स्टोअरमध्ये फिल्मी स्टाईल चोरी, तब्बल चार कोटींच्या रक्कमेसह 436 आयफोन लंपास

अॅपल स्टोअरमध्ये फिल्मी स्टाईल चोरी, तब्बल चार कोटींच्या रक्कमेसह 436 आयफोन लंपास

Rate this post

Apple Store iPhone Stolen: अमेरिकेतील सिएटल येथील अॅपल (Apple)  स्टोअरमधून चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये 4.10 कोटी रुपये किमतीचे 436 आयफोन लुटले.  अमेरिकन वेब सिरीज ‘मनी हेस्ट’ किंवा ‘ओशन्स इलेव्हन’ हा चित्रपट पाहिला असेलच, त्याच धर्तीवर चोरांनी अॅपल स्टोअरच्या शेजारी असलेल्या कॉफी शॉपचा वापर करून अॅपल स्टोअरची सुरक्षा यंत्रणा तोडून त्याच्या मागील खोलीत प्रवेश केला. बाथरूमची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सुमारे 50,000 डॉलर म्हणजेच सुमारे 4.10 कोटी रुपये किमतीचे 436 आयफोन  लंपास केले.

Also Read  आजपासून मुंबईत अॅपलचं स्टोअर सुरू, देशातील पहिलं अधिकृत स्टोअर

सिएटल कॉफी गियरचे सीईओ माईक ऍटकिन्सन यांनी केलेल्या ट्विटनुसार, चोरांनी जवळच्या कॉफी शॉपचा वापर करून अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी कॉफी शॉपमधून कोणतीही चोरी केलेली नाही.  चोरट्यांनी कॉफी शॉपचे कुलूप आणि बाथरूमची भिंत फोडली, ज्याच्या दुरुस्तीसाठी मालकाला अंदाजे  1,23,000 रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

सिएटल कॉफी गियरचे प्रादेशिक किरकोळ व्यवस्थापक एरिक मार्क्स यांनी किंग 5 न्यूज वेबसाइटला सांगितले की,  चोरांनी कॉफी शॉपमध्ये प्रवेश केला आणि नंतर अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी अॅपल स्टोअरची सुरक्षा यंत्रणा तोडली.  हा पूर्वनियोजित कट होता.  दुकानाचे आणि त्याच्या आसपासच्या परिसराचा पूर्ण अभ्यास करून चोरांनी हा कट रचला. ज्या पद्धतीने चोरांनी चोरी केली ती व्यवस्थित नियोजन दिसत आहे.  चोर हे दुकानाची माहिती असणारे असल्याची शक्यता आहे.  चोरीचे फुटेज पोलिस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. परंतु, हा सखोल तपास झाल्यानंतर हे फुटेज सार्वजनिक करण्यात येणार आहे.

Also Read  स्मार्ट फोनमध्ये आपात्कालीन अलर्ट सक्तीचा

कॉफी शॉपचे सीईओ अॅपल स्टोअरच्या प्रवेश करण्यासाठी वापरण्यात आलेल्य बोगद्याचे छायाचित्र  कॉफी शॉपचे आयके ऍटकिन्सनने ट्विटरवर पोस्ट देखील केले. त्यांनी ट्विट केले की,  आमच्या  दुकानाचा वापर करत दोन चोरांनी अॅपल स्टोरमध्ये चोरी केली. सुमारे 50,000 डॉलर  किंमतीचे फोन चोरांनी लुटले.  मात्र सध्या ही पोस्ट त्यांच्या अकाऊंटवरून त्यांनी हटवली आहे.

Also Read  Aadhaar Card Update:आधार कार्डला झाले 10 वर्षे? विनामूल्य करा आधार कार्ड अपडेट, केवळ काही दिवसांसाठीच संधी

दरम्यान या चोरी संदर्भत अॅपलकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अॅपलने आतापर्यंत चोरीच्या घटनांवक कधीच कोणती माहिती दिलेली नाही. तसेच अॅपलशी संबंधितांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Apple Store in Mumbai: मुंबईतील अॅपल स्टोअर आहे अत्यंत युनिक, या आहेत 5 युनिक गोष्टी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?