Android Apps: सध्या स्मार्टफोन्स यूजर्सची संख्या वेगानं वाढत आहे. याबरोबर सायबर धोकेही वाढत आहेत. आता मोबाईलमधील काही अॅपच्या माध्यामातून सायबर गुन्हेगारी वाढत आहे. हे गुन्हेगार तुमच्या मोबाईलमधील डेटावर डल्ला मारून चुकीचा वापर करू शकतात. हा मोबाईल डाटा चोरण्यासाठी ( Mobile data hack) अनेक हातखंडे वापरले जातात. सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध अॅण्ड्राईट अॅपच्या (Android Apps) माध्यामातून व्हायरस टाकलं जातं. यामुळे तुमच्या मोबाईलमधील डाटा चोरीला जाऊ शकतो. या चोरी केलेल्या डेटाच्या आधारावर सायबर क्रिमिनल्स गुन्हेगारीला अंतिम स्परूप देतात. हे लक्षात घेऊन प्ले स्टोअरने आतापर्यंत अनेक अॅप्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत. मालवेअर फॉक्सच्या एका रिपोर्टनुसार, गेल्या 10 वर्षापासून सायबर गुन्हेगारांनी अॅन्ड्रॉईड मोबाईलफोन्सना टार्गेट केलं आहे. याचं कारण हे सर्व ओपन सोर्स प्रोग्राम्स असून यांच्यात सहजपणे बदल केलं जाऊ शकतं.
हे सायबर क्रिमिनलकडून मालवेअर प्रोग्रामसारखे Adware,Trojans, Spyware आणि Keyloggers यांना अॅन्ड्रॉईड अॅप्समध्ये इन्स्टॉल केलं जातं आणि लोकांची माहिती चोरी केली जाती. सायबर गुन्हेगार गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध अॅप्समध्ये काही मॅलिशस कोड टाकून त्याला मॉडिफाईड करतात आणि अॅन्ड्रॉईड युजर्सना हे समोरून काहीच दिसत नाही. यानंतर तुम्ही अॅप डाऊनलोड केल्यानंतर हळूहळू डेटा लीक होतो. या रिपोर्टनुसार, अॅन्ड्रॉईड युजर्सना त्यांच्या मोबाईल फोन्समधून 19 अॅप्सना हटवण्यासाठीही सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईल फोन्समध्ये ‘हे 19’ अॅप्स इन्स्टॉल केले असतील, तर आताच्या आता मोबाईलमधून काढून टाका.
मोबाईलमधून हे 19 अॅप्स लवकर डिलीट करा
1. Fare Gamehub आणि Box
2. Hope Camera-Picture Record
3. Same Launcher आणि Live Wallpaper
4. Amazing Wallpaper
5. Cool Emoji Editor आणि Sticker
6. Simple Note Scanner
7. Universal PDF Scanner
8. Private Messenger
9. Premium SMS
10.Blood Pressure Checker
11. Cool Keyboard
12. Paint Art
13. Color Message
14. Vlog Star Video Editor
15. Creative 3D Launcher
16. Wow Beauty Camera
18. Gif Emoji Keyboar
19. Instant Heart Rate Anytime आणि Delicate Messenger
अॅप डाऊनलोड करण्याआधी ही घ्या काळजी
नेहमी अधिकृत प्ले स्टोरवरूनच मोबाईल अॅप्स डाऊनलोड करा. याशिवाय कोणतंही अॅप्स डाऊनलोड करण्याआधी अॅप्सची संपूर्ण माहिती घ्या आणि सुरक्षित असेल तरच डाऊनलोड करा. अॅप रिव्ह्यूवरुन तुम्हाला समजून येईल की, एखाद्या व्यक्तीसोबत सायबर फ्रॉडसारखी वाईट घटना घडली असेल, तर तशा यूजर्सच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतील. यामुळे तुम्हाला आधीच माहिती मिळाल्यामुळे फ्रॉडच्या जाळ्यात न फसता सुरक्षित राहाल.
Check Your Internet speed Check Now
Pingback: HSC SSC Exma Result : दहावी बारावीचा निकाल या तारखेला जाहीर होण्याची शक्यता या वेबसाईटवर बघू शकता निकाल ! - आ
Pingback: Sanchar Saathi Portal: एकावेळीच होणार तीन कामं जाणून घ्या संपूर्ण माहिती - आपला अभ्यास- Aplaabhyas
Having read thijs I though itt wwas razther informative.
I appreciate you finding the time and effoort to put tuis content together.
I onbce again ind myself spending a signifocant amount off tike botth reading aand
powting comments. But so what, it was still worrth it!
Doees your website havee a contact page? I’m having a ttough tjme locating itt
but, I’d likke to shoot you ann email. I’ve ggot somee suggetions for youir blog yoou migfht bee interesteed inn hearing.
Either way, great blog and I loook forward to seeing it
imorove over time.