Adenovirus Infection :आता वाढतोय एडिनोव्हायरसचा धोका! यकृतासोबत शरीराच्या ‘या’ भागांनाही पोहोचवतो नुकसान…

Adenovirus Infection :आता वाढतोय एडिनोव्हायरसचा धोका! यकृतासोबत शरीराच्या ‘या’ भागांनाही पोहोचवतो नुकसान…

Rate this post

Adenovirus Infection : एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत त्याचा आणखी फैलाव होऊ शकतो. पश्चिम बंगालनंतर आता बंगळुरुमध्येही लहान मुलांना या व्हायरसची लागण झाली आहे. एडिनोव्हायरसमुळे बंगळुरुमधील दोन वर्षांच्या मुलीचे यकृत आणि किडनी खराब झाली आहे. या व्हायरसच्या संसर्गावेळीच दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि बंगळुरुमधील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बाल वॉर्डात श्वासोच्छवासाचा त्रास होत असलेल्या बालकांना दाखल केले जात आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एडिनोव्हायरसने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे श्वासोच्छवासाचा त्रास. हा विषाणू मुख्यतः 6 महिने ते 2 वर्षे वयोगटातील मुलांचा बळी घेतो. एडिनोव्हायरस (Adenovirus) दिवसेंदिवस आणखी धोकादायक होत आहे, या विषाणूमुळे मुलांचे यकृत-किडनी खराब होत आहेत.

Also Read  Paneer Side Effects: पनीर खाण्याचे फायदे अनेक, दुष्परिणामही तितकेच

एडिनोव्हायरस हा काय प्रकार आहे?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, एडिनोव्हायरस हा एक प्रकारचा विषाणू आहे जो तुमच्या शरीराला हळूहळू आजारी बनवतो आणि नंतर हा संसर्ग शरीरात धोकादायक रुप धारण करतो. एडिनोव्हायरसने ग्रस्त असलेल्या मुलांना श्वास घेण्यास त्रास जाणवतो.

एडिनोव्हायरसची लक्षणे

एडिनोव्हायरसची लक्षणे खूप सामान्य आहेत, जे इतर व्हायरल इन्फेक्शनच्या तुलनेत सौम्य असतात. एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या मुलांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो. थकवा, भूक न लागणे ही काही एडिनोव्हायरसची लक्षणे आहेत. लक्षण जाणवत असलेल्या मुलांची चाचणी केल्यानंतरच त्यांना एडिनोव्हायरस झाला आहे हे कळते. या व्हायरसचा फैलाव सहसा हिवाळ्याच्या सुरुवातीला सुरु होतो आणि वसंत ऋतूमध्ये तो शिगेला पोहोचतो, पण यंदा उन्हाळ्यातही एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही.

Also Read  Health Tips : तुमचे डोळे वारंवार लाल होतात? ही सामान्य समस्या नाही तर आहे गंभीर आजार; वेळीच सावध व्हा

एडिनोव्हायरसचा संसर्ग कोणाला होऊ शकतो?

एडिनोव्हायरस मुख्यत: लहान मुलांना किंवा कोणत्याही वयाच्या व्यक्तीलाही होऊ शकतो. पण 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये याचा संसर्ग खूप सामान्य आहे. एडिनोव्हायरस बऱ्याचदा नवजात बाळ आणि लहान मुलांमध्ये पसरु शकतो. हा विषाणू एका मुलाकडून दुसऱ्या मुलांमध्येही पसरतो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, हा विषाणू मुलांनी तोंडात वस्तू टाकल्यानेही पसरतो.

एडिनोव्हायरसशी लढण्यासाठी लावल्या गेल्या ईसीएमओ मशिन्स

एडिनोव्हायरसच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, कोविड-19 च्या उपचारात ईसीएमओ मशीन वापरण्यात आल्या होत्या. श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णावंर उपचार करण्यासाठी हे मशीन उपयुक्त ठरते. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे,  या वर्षाच्या सुरुवातीला एडिनोव्हायरसची लागण झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांसाठी ECMO (एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) हे मशीन जीवनरक्षक ठरले आहे.

Also Read  Chhatrapati Sambhaji Nagar News:ऑडी क्यू 3 कारचे उत्पादन आता संभाजीनगरात; शहराची आणखी एक वेगळी ओळख

जानेवारी ते एप्रिलदरम्यान एडिनोव्हायरसच्या तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिघांचीही प्रकृती चिंताजनक होती. तिघांचीही एडिनोव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ECMO मशिनवर ठेवण्यात आले होते. यातील पाच वर्षांचा मुलगा 18 दिवस ECMO वर होता. 15 वर्षांची मुलगी 47 दिवस ECMO मशिनवर होती, तर चार वर्षांचा मुलगा आठ दिवस मशिनवर होता. दीर्घ उपचारानंतर ही मुले बरी झाली.

संबंधित बातम्या:

Health Tips: सावधान ! मलेरिया, कोरोना आणि इन्फ्लूएंझाच्या रूग्णांत एकसारखाच ताप, दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

13 thoughts on “Adenovirus Infection :आता वाढतोय एडिनोव्हायरसचा धोका! यकृतासोबत शरीराच्या ‘या’ भागांनाही पोहोचवतो नुकसान…”

  1. Pingback: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात! DA मध्ये होणार पुन्हा भरघोस वाढ  - आपला अभ्यास- Aplaabh

  2. Pingback: Health Tips : या' कारणामुळे उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा अधिक होते; कारण आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या - आ

  3. Pingback: Side Effects Of Coffee:सकाळी उठताच कॉफी पित असाल तर सावधान! शरीरासाठी ठरू शकतं घातक - आपला अभ्यास- Aplaabhyas

  4. Pingback: IPL 2023 : विजय शंकरचा 'तांडव', गुजरातचा कोलकात्यावर सात विकेटने विजय - आपला अभ्यास- Aplaabhyas

  5. Pingback: How Many Eggs Should I Eat A Day:दररोज अंडी खाण्यामुळे होणारे फायदे? - आपला अभ्यास- Aplaabhyas

  6. Hello would you mind stating which blog platform you’re working with?
    I’m planning to start my own blog in the near future but
    I’m having a tough time making a decision between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal.
    The reason I ask is because your layout seems different then most blogs and I’m
    looking for something unique. P.S My
    apologies for getting off-topic but I had to ask!

    Here is my site … vpn special code

  7. Hello there I am so thrilled I found your blog page, I really found
    you by mistake, while I was looking on Bing for something
    else, Regardless I am here now and would just like to say thanks a lot for a marvelous post and a all round entertaining blog (I also love the theme/design), I don’t have
    time to read through it all at the moment but I have bookmarked it and also included your RSS feeds,
    so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the superb work.

    My web page: nordvpn special coupon code 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?