Mother’s Day 2023:मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा…

Mother’s Day 2023:मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा…

Rate this post

Mother’s Day 2023: आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव आणि गाव, आई म्हणजे आयुष्याची शिदोरी… इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरीक्षण सर्वांनाच लागू पडतं असं नाही. आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करु शकणार नाही. मात्र तरीही तिने आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन (Mother’s Day). जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो.

Also Read  तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज वाढवायची आहे? तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

यंदाही हा दिवस महाराष्ट्रासह देशात आणि जगभरात साजरा केला जाईल. याच मातृदिनाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.

मातृदिन (Mother’s Day) म्हणजे काय?

प्रत्येक आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजेच मातृदिन (Mother’s Day). आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, सर्वांसाठी सतत कष्ट करणाऱ्या आईचे आभार मानण्यासाठी हा  दिवस साजरा केला जातो.

कशी झाली मातृदिन (Mother’s Day) साजरा करण्याची सुरुवात?

मातृदिन साजरा करण्याती पहिली सुरुवात अमेरिकेतून झाली. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस (Anna Jarvis) यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं. त्यांनी स्वतः लग्न केलं नव्हतं. ती सदैव आपल्या आईसोबतच राहत असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मातृदिन (Mother’s Day) साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा करण्यात येऊ लागला.

Also Read  पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी आक्रमक, बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात धडक

मातृदिन (Mother’s Day) कधी साजरा केला जातो?

जगभरात मदर्स डे वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या तारखांना येतो. पण, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणती विशिष्ट तारीख ठरलेली नसते. मात्र, 10 मे 1914 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला होता. ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की, मे महिनाच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्यात येईल. तेव्हापासून भारत आणि इतर देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जाऊ लागला. यंदा मातृदिन (Mother’s Day) 14 मे रोजी आहे.

Also Read  शहापूर तालुक्यात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग, तीन महिन्यात पाच लाखांचा नफा

कसा साजरा केला जातो मातृदिन (Mother’s Day)?

प्रत्येकजण मातृदिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. तसं बघालयला गेलं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची गरज नसते. पण मातृदिनाच्या दिवशी आईवरील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस असतो, यावेळी काही लोक आर्थिक रुपात, वस्तू रुपात किंवा कामात मदत करुन आईवरील आपलं प्रेम व्यक्त करतात.

हेही वाचा:

Mother’s Day 2023: हा मदर्स डे बनवा खास! तुमच्या आईला भेट द्या आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवणाऱ्या ‘या’ गोष्टी!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?