Fake WhatsApp Call: व्हॉट्स अॅपवरुन (Whatsapp) खोटे कॉल किंवा मेसेज (Fake Call Messages) येणं हे काही नवीन नाही. खरंतर व्हॉट्स अॅपवर अशा गोष्टी घडणं हल्ली खूप साधाराण झालं आहे. म्हणूनच लोकं पुन्हा जुन्या एसएमएसच्या (SMS) पद्धतीकडे वळले आहेत. पण तरीही व्हॉट्स अॅपवरुन फसवणूकीचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत.
परंतु, एखाद्या नावजलेल्या कंपनीकडून त्यांच्या ब्रँडची प्रसिद्धी करणारे मेसेज येत असतील तर काळजी करण्याची गरज नाही. पण बऱ्याचदा व्हॉट्स अॅपवर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल येतात. परंतु, हे कॉल भारतातून नसल्याचं कॉल आलेल्या नंबरवरुन लगेच ओळखता येतं. त्या नंबरचा ISD कोड हा बाहेरच्या देशाचा असतो, जसे की मलेशिया, केनिया आणि व्हिएतनाम वैगरे देश…
बरेच लोक असे कॉल आले की, पटकन घाबरुन जातात आणि त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, आपला नंबर कॉल करणाऱ्या व्यक्तीपर्यंत कसा पोहचला.
व्हॉट्स अॅपवर हे स्कॅम कॉल कसे येतात?
कदाचित तुम्हांला माहित असेल व्हॉट्स अॅप हे VoIP नेटवर्क म्हणजेच, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल या नेटवर्कवर काम करते. या नेटवर्कमुळे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता कोणालाही आणि कधीही कॉल करु शकता. पण ही गोष्ट अजिबात दुर्लक्षित करण्यासारखी नाही आहे. तुम्ही जर सोशल मीडियावरुन याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला कळेल की, बरेच लोक या व्हॉट्स अॅप कॉलमुळे त्रस्त आहेत.
व्हॉट्स अॅपवर आपल्याला साधारणपणे +60 (मलेशिया), +254 (केनिया), +84 (व्हिएतनाम ) हे ISD कोड असलेल्या नंबरवरुन कॉल येतात. तर काही लोकांना +62 (इंडोनेशिया), +223 (आफ्रिकेतील देश माली) हे ISD कोड असलेल्या नंबरवरुन कॉल येतात.
परंतु, या कॉलमागे असलेला हेतू लोकांच्या पटकन लक्षात येत नाही. जेव्हा तुम्हाला अशा अनोळखी नंबरवरुन कॉल येतात, तेव्हा तुमची बरीच माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या बँकेच्या खात्याची माहिती घेऊन त्यातले पैसे चोरीला जाण्याची देखील शक्यता असते. पण तुम्हाला व्हॉट्स अॅपवर वेगवेगळ्या देशातून कॉल येत असतील तरीही ते त्याच देशातून येतात हे कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. कारण हल्ली आतंरराष्ट्रीय नंबर सहज विकत देखील घेता येतात.
व्हॉट्स अॅपवर तुम्हाला एन्क्रिप्शन फिचर असते, ज्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेणे कठीण होते. त्यामुळे जर तुम्हाला वर नमूद केलेल्या कोणत्याही ISD कोडवरून व्हॉट्स अॅपवर कॉल आला तर आम्ही तुम्हाला कॉल न उचलण्याचा आणि नंबर ब्लॉक करणं कधीही चांगलं ठरु शकतं. त्यामुळे असे कॉल येण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check Your Internet speed Check Now
freelancing साईटवरून पैसे कमवण्याच्या विविध पद्धती
Pingback: WhatsApp: फेक कॉल रोखण्यासाठी भारत सरकारने 'हा' महत्त्वाचा निर्णय घेतला - आपला अभ्यास- Aplaabhyas