Health Tips:तुम्ही अंघोळीनंतर ‘या’ चार गोष्टी टाळायला हव्यात

Health Tips:तुम्ही अंघोळीनंतर ‘या’ चार गोष्टी टाळायला हव्यात

Rate this post

Health Tips: सध्याच्या काळात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी  प्रत्येकालाच जीमला जाऊन वर्क आऊट करणं शक्य नाही. पण दैनंदिन आयुष्यात काही नियम पाळले, तर तुम्ही  फिट आणि हेल्दी राहू शकता. तसेच या  नियमाचं काटेकोरपणाने  पालन केलं. तर त व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता फार कमी असते. जसे की, फिट आणि हेल्दी राहण्यासाठी डाएट पालन करणे आवश्यक आहे. अगदी तसंच काही नियमाचं पालन करणे आवश्यक आहे. अशातच तुम्हाला आजारापासून दूर राहायचं असेल, तर अंघोळीशी संबंधित काही गोष्टींच पालन करणे आवश्यक आहे. याचं आपल्यातील बहुतेक लोक पालन करत नाहीत. आता तुम्हाला वाटल असेल की, अंघोळीचा आरोग्याशी काय कनेक्शन आहे. खरं तर अंधोळ आणि आरोग्य या दोन गोष्टींचा मोठ कनेक्शन आहे. त्यामुळे तुम्ही अंघोळीनंतर (after taking a bath) चुकूनही या चार गोष्टी करू नका. या गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात. या चार गोष्टी कोणत्या आहेत? ते आज सविस्तर जाणून घेऊया…

Also Read  Health Tips : या' कारणामुळे उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा अधिक होते; कारण आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या

अंघोळीनंतर ‘या’ चार गोष्टी टाळा

1. तुम्हाला अंघोळीनंतर लगेच पाणी प्यायची सवय असेल, तर लगेच बंद करा. अंघोळीनंतर लगेच पाणी पिणे टाळा. खरे तर, प्रत्येकाने अंघोळीनंतर पाणी पिणे टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. याच कारण जेव्हा तुम्ही अंघोळ केल्यानंतर तुमच्या शरीराचं तापमान आणि रक्ताभिसरण खूप वेगळं असतं. तुम्ही अंघोळीनंतर लगेच पाणी पित असाल. तर तुमच्या रक्ताभिसरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशरचं संतुलन बिघडू शकतं.

Also Read  Health Tips फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या 'या' वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर

2. तुम्ही अंघोळ केल्यानंतर लगेच तु्मच्या त्वचेला, अंग जोरजोरात घासून पुसू नका. याचं कारण तुमची त्वचा कोरडी, शुष्क होऊ शकते. तुमची त्वचा डिहायड्रेट होऊ शकते. यामुळे खाजही सुटू शकते आणि आजारी पडू शकता. त्यामुळे अंघोळीनंतर त्वचेला घासून पुसायची सवय असेल, तर ही सवय लवकर टाळा.

3.  तुम्हाला अंघोळीनंतर हेअर ड्रायरने केस सुखावण्याची सवय असेल, तर टाळा. हेअर ड्रायरमुळे केसांमधील आवश्यक ओलसरपणा निघून जातो आणि केसांत कोरडेपणा  येऊ शकतो. यामुळे केसांचा गुंता वाढून केस गळायला लागू शकतात. त्यामुळे केस सुखवण्यासाठी  हेअर ड्रायरचा वापर करणे टाळा.

4. तुम्हाला अंघोळीनंतर लगेच ऊन्हात बाहेर पडायची सवय असेल अथवा अंघोळीनंतर ऊन्हात बसायची सवय असेल, तर ही सवय टाळा. आरोग्याच्या दृष्टीने अंघोळीनंतर लगेच ऊन्हात बाहेर पडण्यापासून टाळायल हवं. यामुळे ऊन्हाच्या कडक झळा लागून तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. तसेच तुम्हाला सर्दी, खोकला आणि ताप येऊ शकतो आणि तुम्ही गंभीर आजारी पडू शकतो.

Also Read  New Ducati Monster SP Sport Bike: डुकाटीची नवीन बाईक लॉन्च; पाहा किंमत, लूक आणि फिचर्स...

(टीप : वरील सर्व बाबी Aplaabhyas Team केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून Aplaabhyas  Team कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

Check out below Health Tools-

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

 

1 thought on “Health Tips:तुम्ही अंघोळीनंतर ‘या’ चार गोष्टी टाळायला हव्यात”

  1. Pingback: freelancing: फ्रीलांसिंग साईटवरून पैसे कमवण्याच्या विविध पद्धती - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?