IPL 2023 Team Position : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 48 व्या सामन्यात गुजरात विरुद्ध राजस्थान (GT vs RR) रोमांचक लढत पाहायला मिळाली. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या चालू मोसमात सातवा विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने राजस्थानकडून मागील पराभवाचा बदला घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानच्या फलंदाजांना गुजरातच्या गोलंदाजांनी पुरतं नमवलं आणि 17.5 षटकात पूर्ण संघ तंबूत परत पाठवला. गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनीही धडाकेबाज पद्धतीने सामना संपवला. गुजरातने हा सामना 37 चेंडू राखून जिंकला. यानंतर गुजरात पहिल्या स्थानावर कायम आहे.
मुंबई की बंगळुरु, टॉप 4 मध्ये कोण?
दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये मुंबई आणि बंगळुरु संघाला आगामी सामन्यात विजयी कामगिरी करत टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. आज मुंबईचा सामना चेन्नईसोबत आणि बंगळुरुचा सामना दिल्लीसोबत होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे, मुंबई संघ सहाव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांमधील जो संघ आज विजय मिळवेल त्या संघाला टॉप 4 मध्ये जाण्याची संधी आहे.
आयपीएल गुणतालिकेत गुजरात टायटन्स अव्वल
राजस्थानविरुद्ध विजयानंतर गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरात संघाने दहापैकी सात सामने जिंकले असून संघाकडे 14 गुण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लखनौ आहे. लखनौ संघाने 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघानेही 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत.
IPL 2023 Points Table – If RCB and MI wins tomorrow, they’ll enter the Top 4. pic.twitter.com/vEUVTCSFON
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 5, 2023
इतर संघांची परिस्थिती काय?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुकडे 10 गुण असून संघाने नऊपैकी पाच सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. पंजाब संघ 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर, आठव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता संघाकडे 10 गुण आहेत. कोलकाता संघाने दहा पैकी चार सामने जिंकले आहे. हैदराबाद संघ सहा गुणांसह नवव्या स्थानावर असून संघाने नऊपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत सर्वात शेवटी दिल्ली कॅपिटल्स असून संघाकडे सहा गुण आहेत. दिल्लीने आतापर्यंतच्या नऊपैकी फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check Your Internet speed Check Now