WTC 2023:टीम इंडियाला दुखापतीचा फटका,  कोण WTC फायनलमधून बाहेर तर काहींच्या खेळण्यावर सस्पेन्स

WTC 2023:टीम इंडियाला दुखापतीचा फटका,  कोण WTC फायनलमधून बाहेर तर काहींच्या खेळण्यावर सस्पेन्स

Rate this post

WTC 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलला सुरुवात होणार आहे.  लंडनमधील ओव्हल मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकसमोर उभे असतील. ऑस्ट्रेलिया आणि भारताने आपल्या टीमची घोषणा केली आहे. काही खेळाडू इंग्लंडमध्ये सराव करत आहेत. तर काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. पाच खेळाडू दुखापतीमुळे खेळणार नाहीत.  यामधील तीन खेळाडूंना आयपीएलमध्ये दुखापत झाली आहे.

जयदेव उनादकट –

जयदेव उनादकट याने  12 वर्षांच्या कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन केले होते. बागंलादेशविरोधात त्याचे टीम इंडियात पुनरागमन झाले होते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयनच्या संघात त्याची वर्णी लागली होती. पण आयपीएलमध्ये खेळताना जयदेवला दुखापत झाली आहे.  लखनौ संघाकडून खेळणाऱ्या जयदेवला सरावारम्यान खांद्याला दुखापत झाली. जयदेवची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जातेय. मुंबईत स्कॅन करण्यात आले आहे. बेंगलोरमध्ये एनसीएमध्ये जयदेव दुखापतीवर काम करत आहे. त्याचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपमध्ये खेळण्याची शक्यता कमीच वाटतेय.

Also Read  IPL 2023 KKR vs SRH : कोलकात्यासाठी रिंकू पुन्हा आला धावून, अखेरच्या चेंडूवर मारला चौकार

केएल राहुल

लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना केएल राहुल याला दुखापत झाली. राहुलची दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जातेय. राहुल सध्या आराम करत आहे. आरसीबीविरोधात राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण एकही धाव घेतली नाही.  राहुल सध्या फॉर्मसोबत दोन हात करत आहे, त्यातच त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये राहुलला स्थान मिळणार का? याबाबत सस्पेन्स आहे.

उमेश यादव –

आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळणाऱ्या उमेश यादव यालाही दुखापत झाली आहे. मागील काही सामन्यात त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नाही. दुखापतीमुळे उमेश यादवला आराम दिल्याचे बोलले जातेय. उमेश यादव याची दुखापत किती गंभीर आहे,  याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण यादवच्या खेळण्यावरही सस्पेन्स कायम आहे.

Also Read  Job Majha : पुणे महानगरपालिकेत नोकरीच्या संधी : 18 एप्रिल 2023 : ABP Majha

शार्दूल ठाकूर –

अष्टपैलू शार्दूल ठाकूर यालाही आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. दुखापत सध्या ठिक झाली आहे. त्याने कोलकात्याच्या संघात पुनरागमन केले. पण शार्दूल ठाकूर याने गोलंदाजी केली नाही. त्यामुळे दुखापत किती गंभीर आहे…की दुखणं अंगावर काढतोय.. याबाबत काहीच समजायला मार्ग नाही. पण शार्दूल ठाकूर शंभऱ टक्के फिट नसल्याचे समोर आले आहे.

अय्यर
मार्च 2023 मध्ये श्रेयस अय्यर याने आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. अय्यर याला पाठदुखीचा त्रास होतोय. अय्यर याच्यावर शस्त्रक्रिाय झाली आहे. एनसीएमध्ये तो फिटनेसवर काम करणार आहे. अय्यर तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

Also Read  अदानी समूहावरील कर्जाचा डोंगर वाढला, एका वर्षात 21 टक्क्यांची वाढ; SBI चे किती कर्ज?

ऋषभ पंत
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातातून तो थोडक्यात वाचलाय. पंत दुखापतीवर काम करत आहे. तो एनसीएमध्ये मेहनत घेत आहे. पण आणखी सहा महिने तरी तो क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची शक्यता नाही.

जसप्रीत बुमराह
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह डिसेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर आहे. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्यावर सर्जरीही करण्यात आली.  त्याला ठीक होण्यास आणखी मोठा कालावधी लागणार आहे.   वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलमध्ये बुमराह खेळणार नाही.

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?