LSG vs CSK: चेन्नईच्या संघात दीपक चाहर परतला, लखनौचा राहूल बाहेर, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

LSG vs CSK: चेन्नईच्या संघात दीपक चाहर परतला, लखनौचा राहूल बाहेर, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

Rate this post

LSG vs CSK Live Score IPL 2023:  इकाना स्टेडिअमवर एम एस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौचा संघ प्रथम फंलदाजीसाठी मैदानात येणार आहे. सोमवारी आरसीबीविरोधात झालेल्या सामन्यात केएल राहुल याला दुखापत झाली. त्यामुळे तो आजच्या सामन्याला मुकलाय. आज कृणाल पांड्या नाणेफेकीसाठी मैदानात उतरला होता. पावसामुळे नाणेफेकीला 30 मिनिटे उशीर झाला.. मैदानाची स्थिती पाहता धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे दीपक चाहर याचे संघात पुनरागमन झालेय. लखनौच्या संघामध्येही बदल करण्यात आला आहे.

Also Read  Hyundai Exter Micro SUV :ची ही नवीन कार Tata Punch ला देणार जबरदस्त टक्कर, नाव आहे 'Exter'

लखनौ सुपर जायंट्स संघाची प्लेईंग 11 –
काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, रवि बिश्नोई आणि मोहसिन खान.

चेन्नईचे 11 शिलेदार कोणते ?
ऋतुराज गायकवाड, डेवेन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर आणि कर्णधार), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तिक्षणा

मागील सामन्यात धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई (Chennai Super Kings) संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौ (Lucknow Super Giants) संघानेही आरसीबीविरुद्धचा शेवटचा सामना गमावला आहे.  दोन्ही संघ विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

Also Read  पावसामुळे सामना रद्द, लखनौ-चेन्नईला 1-1 गुण

CSK vs LSG Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Gaints) या दोन संघात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही संघांची स्थिती समान आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

Also Read  RR vs SRH Playing 11 : हैदराबाद विरुद्ध राजस्थान, प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबाबत जाणून घ्या

Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम (Ekana Stadium) ची खेळपट्टी टी20 च्या दृष्टीने येथील खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?