Google Pixel 7a Launch Date: गुगल कंपनी 11 मे रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Pixel 7a लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चची माहिती ट्विट करत दिली आहे. ट्विटमध्ये फोनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. तरी मिळालेल्या माहितीनुसार, हा नवीन फोन पिक्सेलच्या सिरीजमधला Pixel 7a हाच असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला विविध स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स मिळतील. जे गुगल पिक्सेल 6a (Google Pixel 6a) पेक्षा अधिक चांगले असतील. गुगलचे फोन हे फोटोग्राफीसाठी चांगले मानले जातात. जाणून घेऊया गुगलच्या नवीन पिक्सेल 7a (Google Pixel 7a) मधील स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स…
नवीन स्मार्टफोनमध्ये मिळू शकतात हे स्पेसिफिकेशन्स
कंपनी हा स्मार्टफोन 10 मे रोजी त्याच्या आगामी I/O 2023 इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर लॉन्च करेल, यानंतर 11 मे रोजी गुगल पिक्सेल 7a (Google Pixel 7a) भारतात लॉन्च होईल. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल, जो 120hzच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यापूर्वी, Pixel 6a मध्ये 90Hzचा रिफ्रेश दर उपलब्ध होता.
Pixel 7a मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा असेल. समोर 10.8MP कॅमेरा सेल्फीसाठी मिळू शकतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये Google Tensor G2 चिपसेट आणि 4400 mAh बॅटरी मिळू शकते. Google pixel 7a 8GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह लॉन्च केला जाऊ शकतो.
इतकी असू शकते किंमत
Google pixel 7a दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, ज्याची किंमत (Google pixel 7a Price) 45 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत असू शकते. गुगलने स्मार्टफोनची किंमत अद्याप अधिकृतपणे उघड केलेली नाही. 128 GB आणि 256 GB अशा दोन स्टोरेजमध्ये हा फोन उपलब्ध होऊ शकतो.
How to show excitement without shouting? Asking for a friend
Coming to @Flipkart on 11th May. pic.twitter.com/il6GUx3MmR
— Google India (@GoogleIndia) May 2, 2023
गुगलच्या आधी ‘ही’ कंपनी लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन
गुगलच्या आधी, 9 मे रोजी, पोको (Poco) भारतात पोको F5 (POCO F5) मालिका लॉन्च करेल. या अंतर्गत, दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले जाणार आहेत, पहिला Poco F5 5G आणि दुसरा Poco F5 Pro 5G. या सिरीजची किंमत जवळपास 30 हजार रुपये इतकी असू शकते.
हेही वाचा:
Summer Effecsts : सनबर्न घालवायचाय? ‘या’ घरगुती उपायांद्वारे मिळवा स्किन टॅनिंगपासून सुटका