Buying Pottery:मातीची भांडी किंवा मडके विकत घेण्यापूर्वी  कोणती काळजी घ्यावी?

Buying Pottery:मातीची भांडी किंवा मडके विकत घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

Rate this post

Buying Pottery: कडक उन्हामुळे तापमानाचा पार वाढलाय. यामुळे उष्णतेचा त्रास व्हायला लागतो आणि प्रचंड तहानही लागते. ही तहान भागवण्यासाठी थंडगार पाणी पिण्याची इच्छा होते. यासाठी बरेज लोक फ्रीजचं थंड पाणी पितात. यामुळे तात्पुरती तहान भागू शकते पण आरोग्याचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. यामुळे अनेकजण आरोग्याचा विचार करून ओरिजनल मातीच्या भांड्यात (Pottery) किंवा मडक्यातील पाणी पितात. मडक्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे अनेक फायदे आहेत. परंतु, भेसळ असलेल्या मातीचं मडकं विकत घेऊन त्यातील पाणी पिऊन आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतं. कारण भेसळ माती वापरून आणि पेंट केलेली मडकी मार्केटमध्ये विक्रीला आणलेली असतात. या मडक्यातील पाणी पिल्यानंतर आरोग्य धोक्यात येऊ शकतं. यामुळे तुम्हाला तोंड येणं आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. म्हणून बाजारातून मातीची भांडी विकत घेण्यापूर्वी काही गोष्टीं ध्यानात ठेवाव्या.

Also Read  IPL 2023 Points Table :विजयासह मुंबई आणि पंजाबची गुणतालिकेत उडी; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?

मातीची भांडी किंवा मडके विकत घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

1. जर मातीचं भांड किंवा मडके दिसायला चमकदार असेल, तर ते विकत घेऊ नका. कारण जुन्या पद्धतीनं बनवलेल्या मडक्यावर कोणत्याही प्रकारची चमक नसते. असं कलरिंग केलेलं मडक्याला पेंट किंवा वार्नेसचा वापर केला जातो. जे डोळ्यांना खूप आकर्षित करतं. अशा मडक्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक असतं.

Also Read  Latest News:तुम्हीही ऑनलाइन जॉब स्कॅमचा भाग बनताय का? झिरोधाच्या संस्थापकांनी शेअर केला धक्कादायक प्रकार

2. कधीही मडके खरेदी करतेवेळी त्या मडक्यात एखादं कॉईन टाकून हलकेच हलवून बघा. मडक्याचा आवाज जोरदार येत असेल, तर मडके चांगल आहे. तुम्ही हे मडके विकत घेऊ शकता. फक्त फुटलेलं नाही ना, याची पूर्ण खात्री करा.

3. मडके विकत घेत असताना त्याच्या आकर्षक पेटींगमुळे खरेदी करू नका. अशा मडक्यातील पाण्याची चव खराब लागते. पेंटमधील घटक मडक्यातील पाण्यात मिसळतात. यामुळे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. या पेंटमध्ये इथिलीनसारखा घटक असतो.  यामुळे पाण्याची टेस्टही तशीच लागते. यामुळे तोंडाचा आजार आणि पोटाचे विकार होऊ शकतात.

Also Read  Pidilite WD 40, 500 ml Multipurpose Smart Straw Spray, for Auto Maintenance, Rust Remover,Home Improvement,Loosens Stuck & Rust Parts,Removes Sticky Residue, Descaling & Cleaning Agent for Multi Use

4. मडके खरेदी करताना नेहमी कुंभाराने बनवलेलीच मडकी खरेदी करा. या मडक्यामध्ये पाणी टाकून थोडा वेळ वेट करा. यानंतर मडक्याचं ओरिजनल मातीसारखा वास येत असेल, तर हे मडके ओरिजनल असल्याचं समजून जावं. यामध्ये कोणती भेसळ केलेली नसते.

(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ वाचकांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?