Google Doodle: सर्च इंजिन गूगलनं (Google) आज (30 एप्रिल) एक खास डूडल तयार केलं आहे. गूगलनं अभिनेते एलन रिकमन (Alan Rickman) यांचे खास डूडल (Google Doodle) डिझाईन केलं आहे. हॅरी पॉटर आणि डाय हार्ड सारख्या चित्रपटांमुळे एलन रिकमन यांना विशेष लोकप्रियता मिळाली . 30 एप्रिल 1987 रोजी एलन रिकमनने ‘लेस लियझन्स डेंजेरियस’ (Les Liaisons Dangereuses) या ब्रॉडवे प्लेमध्ये काम केले. त्यामुळे आज गूगलनं त्यांचे खास डूडल डिझाइन करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे. जाणून घेऊयात एलन रिकमन यांच्याबद्दल…
एलन रिकमन यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1946 रोजी वेस्ट लंडन, इंग्लंड येथे झाला. एलन रिकमन यांना बालपणापासूनच विविध कलांची आवड होती. माध्यमिक शिक्षणानंतर एलन रिकमन यांनी चेल्सी कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन आणि रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये ग्राफिक डिझाइनचा अभ्यास केला. त्यांनी एका ड्रामा क्लबमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी एलन यांनी जवळच्या मित्रांसह एक डिझाइन कंपनी सुरू केली. वयाच्या 26 व्या वर्षी, रिकमन यांनी ती कंपनी सोडली आणि अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
पाहा गूगलचं खास डूडल:
Harry Potter, Die Hard, Love Actually—Alan Rickman worked his magic in every role he took on.
Learn more about the beloved English actor in today’s #GoogleDoodle → https://t.co/SNOVdyc7NM pic.twitter.com/p6xbaPZSWq
— Google Doodles (@GoogleDoodles) April 30, 2023
हॅरी पॉटरमधील प्रो. स्नॅपच्या भूमिकेनं जिंकली प्रेक्षकांची मनं
हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन, हॅरी पॉटर आणि चेंबर अँड सिक्रेट्स,हॅरी पॉटर अँड प्रिजनर ऑफ अझकाबान, हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर या हॅरी पॉर चित्रपटाच्या सीरिजमध्ये एलन रिकमन यांनी प्रोफेसर सेव्हरस स्नेप ही भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आपल्या कारकिर्दीत, एलन रिकमन यांनी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी तीन नाटके आणि दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. डाई हार्ड (1988) , रॉबिन हुड: प्रिंस ऑफ थीव्स (1991), सेंस एंड सेंसिबिलिटी (1995), आय इन द स्काई (2015) या चित्रपटांमध्ये एलन रिकमन यांनी महत्वाची भूमिका साकारली. 14 जानेवारी 2016 रोजी एलन रिकमन यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Check Your Internet speed Check Now
Pingback: Drinking Water Before Tea तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? याबद्दल सविस्तर जाणून