Auto News : Citroën India कडून नुकतीच नवीन टॉप-ऑफ-द-लाईन शाईन व्हेरियंट (C3 Shine) लॉन्च करण्यात आली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 7.60 लाख रुपये आहे. सिट्रोनने मागील वर्षी जुलै महिन्यात नवीन C3 व्हेरियंट सादर केले होते आणि ते फक्त दोन ट्रिम लेव्हलमध्ये ऑफर करण्यात आले होते. कंपनीने आता अनेक नवी वैशिष्ट्यांसह या टॉप श्रेणीमधील शाईन व्हेरियंट सादर केले आहेत.
नवीन शाईन व्हेरियंटची वैशिष्ट्ये
Citroën C3 Shine मध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, मागील पार्किंग कॅमेरा, डे/नाईट IRVM, 15-इंच डायमंड कट अॅलॉय, फ्रंट फॉग लॅम्प, रिअर स्किड प्लेट, रिअर वायपर आणि वॉशर, रिअर डीफॉगर यांचा समावेश आहे. बी-हॅचचा हा शाईन व्हेरियंट देखील सिट्रोएनच्या कनेक्टिव्हिटी 1.0 योजनेचा एक भाग आहे, जो 35 स्मार्ट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह My Citroën कनेक्टिव्हिटी अॅपसह सुसज्ज असेल.
Citroen ब्रॅण्ड हेड काय म्हणाले?
सिट्रोन इंडियाचे ब्रॅण्ड हेड सौरभ वत्स यांनी सांगितलं की, आम्ही सिट्रोन सी3 च्या नवीन शाईन व्हेरियंट लॉन्चिंगबाबत अतिशय उत्सुक आहोत, शिवाय या सेगमेंटमधील ग्राहकांमध्येही उत्साह आहे.
Citroen C3 चे व्हेरियंट कोणते?
Citroen C3 आता लाईव्ह, फील आणि शाईन या तीन ट्रिम लेव्हलमध्ये ऑफर केले जात आहेत. त्याची एक्स-शोरुम किंमत 6.16 लाखांपासून ते 7.87 लाख रुपये आहे. Citroen India या हॅचबॅकच्या फील आणि शाईन प्रकारांसह Vibe पॅक पर्याय देखील ऑफर करत आहे.
Citroen C3 च्या व्हेरियंटनुसार किमती
1.2P Live – ₹ 6,16,000
1.2P Feel – ₹7,08,000
1.2P Feel Vibe Pack – ₹ 7,23,000
1.2P Feel Dual Tone – ₹ 7,23,000
1.2P Feel Dual Vibe Pack – ₹7,38,000
1.2P Shine – ₹7,60,000
1.2P Shine Vibe Pack – ₹ 7,72,000
1.2P Shine Dual Tone – ₹ 7,75,000
1.2P Shine Dual Tone Wibe Pack – ₹ 7,87,000
या कारला थेट टक्कर
ही कार आधुनिक आणि तरुण ग्राहकांसाठी काही खास ट्वविस्टसह ऑलराऊंडर पॅकेज ठरेल. विशेष म्हणजे ही कार टाटा पंच, निसान मॅग्नाईट, मारुती सुझुकी स्विफ्ट, टाटा टीआगोला थेट टक्कर देईल. या कारची बुकिंगही सुरु झाली आहे. कंपनी या कारमध्ये कमाल फीचर्स देत आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI
Pingback: Freedom hero Rajguru:स्वातंत्र्यवीर राजगुरू - आपला अभ्यास- Aplaabhyas
Pingback: Bike Tips for Summer:उन्हाळ्यात बाईक रायडिंगसाठी जाताना कोणती काळजी घ्यायला हवी? - आपला अभ्यास- Aplaabhyas
Pingback: Drinking Water Before Tea तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? याबद्दल सविस्तर जाणून