7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात! DA मध्ये होणार पुन्हा भरघोस वाढ 

3.5/5 - (2 votes)

 7th Pay Commission मोदी सरकार पुन्हा एकदा मेहरबान झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात राहतील. या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागेल. महागाईच्या जमान्यात त्यांना डीएतील वाढीमुळे दिलासा मिळेल. 

DA

 नवी दिल्ली केंद्र सरकार येत्या काही महिन्यात पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना( Central Government) मोठं गिफ्ट देऊ शकते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची पाचंही बोटं तुपात असतील. मोदी सरकारने( Modi Government) आताच कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांची वाढ केली होती. आता मोदी सरकार यावर्षी दुसऱ्या सहामहीत महागाई भत्त्यात( Dearness Allowance) पुन्हा 4 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. केंद्राने जुलै 2023 मधील पहिल्या सहामहीसाठी डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना आशा आहे की, मोदी सरकार डीएत 4 टक्के वाढीचं गिफ्ट देऊ शकते. हा निर्णय झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्क्यांहून 46 टक्क्यांपर्यंत वाढेल.  7th Pay Commission

Also Read  old pension scheme:संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा?

 DA असा होतो निश्चित 

 कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI- IW( All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. कर्मचाऱ्यांना वर्षांतून दोनवेळा महागाई भत्ता देण्यात येतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येते. जानेवारीत महागाई भत्ता निश्चित करण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी मिळणार आहे. जुलै महिन्याचा निर्णयही पार सप्टेंबर- ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतो. 

Also Read  दोन्ही पायांनी अपंग असताना 10 एकर शेती फुलवली; नांदेडच्या तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा

 वर्षांतून दोनदा होते वाढ  7th Pay Commission

 दुसऱ्या सहामहीसाठी डीएमध्ये वाढीचा प्रस्ताव सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येऊन केंद्र सरकार त्यावर शिक्कामोर्तब करते. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, वर्षांतून दोन वेळा डीएमध्ये वाढ होते. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई दरानुसार केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करते. 

 तर इतका वाढेल पगार 

 जर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली तर डीए 42हून 46 टक्के होईल. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये आहे आणि 42 टक्क्यांच्या हिशोबाने 7560 रुपये डीए होईल. तर डीएत अजून 4 टक्क्यांची वाढ झाल्यास दुसऱ्या सहामहीत हा आकडा 8280 रुपये होईल. म्हणजे महिन्याच्या पगारात 720 रुपयांची वाढ होईल. 

Also Read  Yashasvi Jaiswal IPL 2023 :कधीकाळी मुंबईत पाणीपुरी विकली, आता आयपीएलमध्ये झळकावले शतक

 अशी लागली लॉटरी 

 केंद्र सरकारने अनेक दिवसानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला. जुलै 2021 मध्ये त्यांनी महागाई भत्ता वाढवला. हा भत्ता 17 टक्क्यांहून 28 टक्के करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2021 नंतर पुन्हा तीन वेळा भत्त्यात वाढ झाली. हा भत्ता 31 टक्क्यांवर पोहचला. मोदी सरकारने मार्च 2022 मध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांची वाढ केली. त्यानंतर हा भत्ता 34 टक्क्यांवर पोहचला. आता दोन वेळा 4- 4 टक्क्यांची वाढ झाल्याने हा भत्ता 42 टक्के झाला आहे. 

Check your age with our age calculator check now

11 thoughts on “7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात! DA मध्ये होणार पुन्हा भरघोस वाढ ”

  1. Pingback: Health Tips : या' कारणामुळे उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा अधिक होते; कारण आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या - आ

  2. Pingback: Share Market Opening 28 April :शेअर बाजारासाठी हा आठवडा दमदार, विप्रोसह आयटी क्षेत्रातील शेअर मजबूत स्थितीत - आपला

  3. Pingback: Petrol Diesel Rates Today: कच्च्या तेलाचे दर गडगडले Petrol Diesel लवकरच स्वस्त होणार? - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?