EPF Balance Check : सरकारी, खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांच्या पगारातील एक भाग भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO)मध्ये जमा होत असतो. अशातच पीएफमध्ये जमा होणारी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. परंतु अनेकांना आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये (PF Account) नेमकी किती रक्कम जमा झाली आहे याची कल्पना नसते. जुलैमध्ये कोट्यवधी लोक आपल्या पगाराचा एक भाग प्रॉव्हिडंट फंडमध्ये अर्थात पीएफमध्ये जमा करतात. हीच रक्कम लोक आपल्या निवृत्तीनंतर वापरासाठी ठेवतात किंवा आपत्कालीन वेळेला म्हणजेच गरजेला हे पैसे वापरु शकतात. ही रक्कम नेमकी किती आहे हे तुम्ही अगदी काही क्षणात तपासू शकता. जर तुम्हाला हे पैसे काढून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी ती रक्कम किती आहे हे पाहावं लागेल. हिच माहिती तुम्हाला फक्त एका मिस कॉलवर मिळणार आहे. पण कसं ते जाणून घेऊया..
1. एका मिस कॉलद्वारे जाणून घ्या पीएफ अकाऊंटमधील रक्कम
पीएफ बँक बॅलेन्स तुम्ही फक्त मिस कॉलद्वारे चेक करु शकता. त्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 9966044425 या नंबरवर मिस कॉल द्या. त्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या मोबाइलवर पीएफएफमध्ये जमा रकमेची माहिती मिळेल. पण लक्षात ठेवा पीएफ बँकेचा तुमचा युनिवर्सल नंबर अॅक्टिव्ह असायला हवा तरच तुम्हाला ही माहिती मिळेल. त्याच्यासोबत UAN सोबतही तुमचा मोबाईल नंबर नोंदवलेला असणं आवश्यक आहे.
2. एसएमएस (SMS) द्वारे देखील पीएफ अकाऊंट बॅलन्स चेक करु शकता
मिस कॉल व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या मार्गानेही रक्कम पाहू शकता. SMS करुन पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन EPFOHO UAN नंबर टाईप करा. हा SMS 7738299899 नंबरवर पाठवा. त्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा असलेली रक्कम कळेल.
3. उमंग (UMANG) अॅपद्वारे जाणून घ्या पीएफ रक्कम
SMS आणि मिस कॉल या दोन मार्गांव्यतिरीक्त उमंग अॅप पण एक पर्याय आहे. तुम्ही उमंग अॅप पीएफमधील रकम जाणून घेण्यासाठी वापरु शकता. त्यासाठी उमंग अॅप डाऊनलोड करा. नंतर आपला मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून अॅप सुरु करा. त्यानंतर सर्व सेवा पर्याय निवडा आणि EPFO ऑप्शनमध्ये जाऊन पासबुक निवडा. त्यानंतर तिथे UAN नंबर आणि ओटीपी टाका. नंतर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा असलेली माहिती मिळेल.
संबंधित बातमी
EPFO : UAN नंबर माहीत नाही, PF मधून पैसे काढायचे आहेत? करा ‘हे’ काम
Pingback: Petrol-Diesel Price Today, April 30कच्च्या तेलाचे दर पुन्हा उसळले; पेट्रोल-डिझेलच्या किमतींत बदल झाला? - आपला अभ्यास- Aplaa