KOO Layoff:  कू मध्येही 30 टक्के नोकरकपात; कंपनीने म्हटले, आम्ही तर..
KOO Layoff: कू मध्येही 30 टक्के नोकरकपात; कंपनीने म्हटले, आम्ही तर..
Rate this post
KOO Layoff: आर्थिक मंदीच्या सावटामुळे जागतिक पातळीवर आयटी कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू असताना दुसरीकडे भारतीय आयटी कंपन्यांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. भारतीय मायक्रोब्लॉगिंग कंपनीने कू (Koo App) देखील नोकरकपात केली आहे. कू ने जवळपास 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मागील एक वर्षात 30 टक्के नोकरकपात करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली.
जानेवारीत मिळाला निधी
कू कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, आम्ही नुकतेच जानेवारी 2023 मध्ये 10 दशलक्ष डॉलरचा निधी जमा केला आहे. आम्ही चांगले भांडवल जमा केले आहे. आम्ही सध्या निधी उभारण्याचा विचार करत नाही. या मिळालेल्या रकमेतून आम्ही बरीच प्रगती करत आहोत आणि भविष्यात आवश्यकतेनुसार निधी उभारण्याचा प्रयत्न करू असे कू कंपनीने स्पष्ट केले.
कू अॅपला चांगला प्रतिसाद
ट्वीटरला प्रतिस्पर्धी म्हणून कू ही भारतीय मायक्रोब्लॉगिंग साईट सुरू झाली होती. अॅप लाँच झाल्याच्या अवघ्या तीन वर्षात 60 दशलक्षाहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. कू अॅप लॉन्च केल्याच्या अवघ्या तीन वर्षांत 60 दशलक्षाहून अधिक डाउनलोड मिळवले आहेत.  20 पेक्षा जास्त जागतिक भाषांमध्ये उपलब्ध असलेला जगातील दुसरा सर्वात मोठा मायक्रोब्लॉग आहे.
Koo ने सप्टेंबर 2022 मध्ये  मॉनिटाइजेशन प्रयोग सुरू केले होते.  कंपनीने म्हटले की, इतर सोशल मीडिया कंपन्यांच्या तुलनेत, दैनंदिन अॅक्टीव्ह युजर्सकडून तिला सर्वाधिक सरासरी महसूल मिळत आहे. कंपनी प्लॅटफॉर्मवर 100 हून अधिक ब्रँड्सच्या जाहिरातींसह आपला व्यवसाय तयार करण्यासाठी सतत मॉनिटाइजेशनवर काम करणार आहे.
मेटाकडून कर्मचाऱ्यांना पुन्हा मोठा धक्का
मेटा प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा नोकरकपात करण्याच्या तयारीत आहेत. फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने आता व्यवस्थापकांना मेमो जारी करत नोकरकपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नोकरकपातीत फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (Whatsapp), इंस्टाग्राम (Instagram) आणि संबंधित कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे संकेत मेटा कंपनीने दिले आहेत.
मार्चमध्ये मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केल्यानुसार, नोकरकपात ही खर्च कमी करण्याच्या उपायांचा एक भाग आहे ज्यामुळे महिन्याअखेरीस कंपनीतील 10 हजार पदे कमी होतील. नोकरकपातीची आणखी एक फेरी मे महिन्यात सुरू होणार आहे.
Leave a Comment
Your email address will not be published. Required fields are marked *
error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?