Heat Anxiety: सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. वातारणातील तापमानाचा पारावर गेला आहे. बहुतेकजण उष्णतेच्या लाटेमुळे( heat wave) चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात स्वत: ची काळजी घेणं गरजेचं असतं. अन्यथा उन्हाच्या तडाक्यात सापडल्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावं लागू शकतं. उन्हाची झळ लागणं, बॉडी डिहायड्रेशन या सारख्या समस्या येतात. तसेच, उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे तुम्हाला हिट एंग्जायटीच्या त्रासाला सामोरे जावं लागू शकतं. यामध्ये तुमचं शरीर उच्च तापमानाच्या संपर्कात येतं आणि शरीर तापमानाचं योग्य प्रकारे संतुलन राखू शकत नाही. या अवस्थेला हिट एंग्जायटी ( heat anxiety) असं म्हटलं जातं. थोडक्यात, उष्ण वातावरणात संपर्कात आल्यामुळे थकल्यासारखं होतं. यामुळे डोक दुकी, चक्कर येणं, छातीत धडधड होणं आणि अस्वस्थता वाढणं यासारख्या समस्येला सामोरे जावं लागतं. त्यामुळे या दिवसात स्वत: ची जास्त काळजी घ्यायला हवी. म्हणून हिट एंग्जायटीचा सामना करण्यासाठी काही उपाययोजन कराव्या लागतील…
Heat Anxiety म्हणजे काय?
मानवी शरीराच्या तापमानाचं संतुलन राखण्यासाठी अनेक पद्धती असतात. तुम्ही जास्त काळापर्यंत कडक तापमानाच्या संपर्कात राहिलात तर शरीरातून बाहेर घाम पडणं आणि रक्तवाहिन्यांचं काम सुरळीत चालत नाही. याचं कारण शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता संपलेली असते. त्यामुळे शरीरातील तापमान योग्य प्रमाणात राहत नाही. याच्या परिणामी तुम्हाला हिट एंग्जायटीचा त्रास होतो. या प्रकारच्या एंग्जायटीमुळे उन्हात काम करणारी लोक जास्त प्रभावित होतात.
Heat Anxiety होण्यामागची कारणे?
तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हिट एंग्जायटी होऊ शकते. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं तर शरीरातून योग्यप्रकारे घाम बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीराच तापमान नियंत्रित राहत नाही. तसेच कॅफिन, मद्य आणि साखरयुक्त पेय घेत असाल तर शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. यामुळे हिट एंग्जायटीच्या समस्येला समोरे जावं लागू शकतं. यामध्ये एखाद्याला सतत गरम होत असल्याची भिती वाटत असते. व्यक्तीमध्ये चक्कर येणं, डोकं दुखी, उलटी आणि अस्वस्थता वाढणं अशी काही लक्षणे दिसून येतात.
हिट एंग्जायटीपासून स्वत: ची काळजी घ्या
1. कडक उन्हामध्ये घरातून बाहेर पडू नका. उष्माघाताची शक्यता अधिक असते. यामुळे एंग्जायटीची लक्षणे वाढू शकतात. खूप गरज असेल तेव्हाच घरातून बाहेर पडा. घरातून बाहेर पडताना सोबत पांढऱ्या रंगाची छत्री, डोक्यावर टोपी आणि पाण्याची बॉटल सोबत घ्यायला विसरू नका. यामुळे शरीराचं तापमान संतुलित करू शकाल.
2. जर तुम्हाला कामानिमित्त घरातून बाहेर उन्हात राहावं लागत असेल, तर एंग्जायटीच्या लक्षणांना कंट्रोल करण्यासाठी स्वत: ला थोड शांत करण्याची गरज आहे. शारीरिक हालचाल किंवा काही काम करत असाल तर थंड ठिकाणी जाऊन बसा. शरीरातून जास्त घाम येणार नाही. याची काळजी घ्याल.
3. जिथं काम करत असाल तिथं आधीच थंड जागेचा शोध घ्या. आपल्या आजूबाजूच्या वातावरण शांत आणि थंड राहिल, याची काळजी घ्या.
4. शरीराच्या गरजेनुसार भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि तापमानही कंट्रोलमध्ये राहील. तसेच मद्यपान, कॅफिन यासारख्या पेयांपासून दूरच राहा. यामुळे तुमच्या शरीर डिहायड्रेट होऊन थकवा जाणवू शकतं.
(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
- Calculate The Age Through Age Calculator