Sleep after eating: झोप पुर्ण होऊनही जेवल्यानंतर झोप येण्यामागे ‘ही’ असू शकतात कारणं

Sleep after eating: झोप पुर्ण होऊनही जेवल्यानंतर झोप येण्यामागे ‘ही’ असू शकतात कारणं

Rate this post

Sleeping Immediately after Eating: अनेकदा आपली झोप पुर्ण झाली तरी आपल्याला दिवसात अनेकदा झोप लागत राहते (Sleep after eating) यामागील कारण आपल्या पटकन लक्षातच येत नाही परंतु जर का तुम्हाला जेवणानंतरही झोप लागत असेल तर तुम्हाला दुर्लेक्ष करू चालणार नाही. अशावेळी आपले शरीर (Why we sleep after eating) अनेक संकेत देत असतात. त्यामुळे जर का तुम्हाला जेवणानंतर लगेचच झोप येत असेल किंवा तुम्हाला जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय असेल तर तुम्ही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर का तुम्ही जेवण झाल्यानंतर झोपत असाल तर तुम्हाला या आजारांचा धोका उद्भवू शकतो. तेव्हा जाणून घ्या यामागे नक्की कारणं कोणती आहेत?

Also Read  Health Tips :योग्य जीवनशैलीचा स्वीकार केली, तर हृदयविकारापासून होऊ शकते सुटका

आपल्या जेवणाच्या आणि झोपायाच्या क्रियेत थोडा कालावधी जाणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यालाही त्याप्रकारे जेवल्यानंतर काही वेळानं झोपणं आवश्यक आहे. अनेकांना जेवण झाल्या झाल्या झोपायची सवय असते तेव्हा अशांनी शक्यतो ही सवय वेळीच मोडलेली बरी कारण असं केलं नाहीत तर त्याचा गंभीर परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. रात्री जेवल्यानंतर (Sleeping after Lunch) खासकरून शतपावली झाल्याशिवाय आपण झोप नाही.

रात्रभर आपली पाचनसंस्था चांगली कार्यरत राहण्यासाठी रात्री जेवल्यानंतर काही पथ्यं ही आपल्याला पाळावीच लागतात. त्याप्रमाणे दिवसभर तुम्ही काहीही खाल्लेत तरी लगेचच झोपण्याची सवय लावून घेऊ नका. रात्री झोपायच्या पुर्वी निदान 3 तास आधी जेवावे आणि दुपारी निदान जेवल्यानंतर अर्ध्या तासानं झोपावे.

Also Read  Citroën India कडून नवीन C3 Shine टॉप व्हेरियंट लाँच, काय आहेत वैशिष्ट्ये?

वजन वाढते 

जेवण झाल्यावर लगेचच झोपलात तर तुमच्या वजनात वाढ होऊ शकते. उदाहरणार्थ, जर का दुपारी तुम्ही मस्तपैंकी (Weight Gain) साग्रसंगीत जेवण जेवलात आणि नंतर लगेचच झोपायला गेलात तर त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. अनेकदा दुपारी जेवण झाल्यावर बऱ्याच जणांना झोप लागते परंतु त्यानंतर थोडंस चाला, अन्न नीट पचू द्या मग स्वस्थपणे झोपायचा विचार करू शकता.

छातीत जळजळ होते 

जेवल्यानंतर लगेचच झोपलात तर तुमच्या छातीत जळजळ होऊ शकते आणि एसिडिटी वाढू शकते. त्याचबरोबर पोटाचे विकारही उद्भवू  शकतात.

हेही वाचा – Hair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

पाचनसंस्थेवर परिणाम 

अनेकदा लोकं जेवल्यावर लगेचच पोटावर झोपात. नाही नाही, ही तर अत्यंत चुकीची पद्धत आहे. जेवल्यानंतर लगेचच झोपू तर नकाच पण पोटावरही झोपू नका. ही चूक महागात पडू शकते. मुख्य म्हणजे जेवल्यानंतर लगेचच झोपलात तर तुम्हाला गॅस आणि एसिडिटीसारखे आजार होऊ शकतात ज्याचा परिणाम तुमच्या पोटावर होईल आणि परिणामी पचनसंस्थेवर होईल. असं केल्यानं मधूमेहाचाही धोका वाढू शकता.

Also Read   World Red Cross Day 2023: आज जागतिक वर्ल्ड रेड क्रॉस डे, काय आहे इतिहास?

काय आहेत कारणं? 

यामागे प्रोटीनच्या जेवणात ट्रिप्टौफॅन असते ज्यामुळे झोप येऊ शकते. जेवणानंतर इन्सुलिनची मात्रा वाढली तर त्याचा परिणाम तुमच्या झोपवर होतो. यामध्ये हॉर्मोन्सही महत्त्वाची भुमिका बजावतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?