आता घराबाहेरही लुटा गेमिंगचा आनंद, वायफायसारख्या स्पीडने ऑन-द-गो गेमिंगचा अनोखा अनुभव

आता घराबाहेरही लुटा गेमिंगचा आनंद, वायफायसारख्या स्पीडने ऑन-द-गो गेमिंगचा अनोखा अनुभव

Rate this post


Airtel :  गेमर्ससाठी चांगले आणि वेगवान इंटरनेट किती महत्त्वाचे आहे याची त्यांच्याशिवाय इतर कोणालाही कल्पना नसेल. गेमर्सना चांगलं माहित आहे की, आपल्याकडील डिव्हाईसचा हार्डवेअर कितीही चांगला असला तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडे चांगलं इंटरनेट असेल तर तोच बाजी मारणार. परंतु एअरटेल 5G प्लसची वापरणाऱ्या गेमर्सना यापुढे स्लो इंटरनेटचा सामना करावा लागणार नाही. कारण Airtel 5G Plus अनलिमिटेड 5G (प्रारंभिक ऑफर) सोबत 30 पट स्पीड मिळते, ज्यामुळे गेमर्सना गेमिंगचा शानदार अनुभव मिळेल.

खरंतर, Airtel 5G Plus तंत्रज्ञान हे गेमर्ससाठी सर्वसमावेशक उपाय म्हणून उदयास आले आहे. Airtel 5G Plus नेटवर्क वाय-फाय सारखा स्पीड देते, अगदी घराबाहेर देखील. Airtel 5G Plus च्या या उपक्रमामुळे, गेमिंग प्रेमी त्यांच्या आवडत्या गेमचा घरात बसून आणि घराबाहेर देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय आनंद लुटू शकतात. 

क्लाऊड गेमिंगसाठी वेगवान इंटरनेट स्पीड आवश्यक

सध्याचे स्मार्टफोन हे गेटवे प्लेस्टेशनपेक्षा कमी नाहीत. क्लाऊड गेमिंगसह, आता मोबाईल डिव्हाईसवर आपल्या आवडते पीसी गेम खेळणे शक्य आहे. 5G सह गेमर गेमिंग रिंगसाठी मोबाईल फोनवर गेमिंगचा अनुभव घेऊ शकतात. Airtel 5G Plus मोबाईल स्ट्रीमिंग आणि गेमिंगचा अनोखा अनुभव देते. याचा वापर करुन युझर्स स्वतःला गेमिंग लीडर बनवू शकतात.

Also Read  WTC Final : ऋतुराज, सूर्यकुमार अन् मुकेश कुमारलाही मिळाले इंग्लंडचे तिकिट

Airtel 5G Plus ऑन-द-गो वाय-फाय सारखा स्पीड

Airtel 5G Plus सेवा सुरु होण्यापूर्वी, COD, Fornite आणि काऊंटर स्ट्राईक सारखे लोकप्रिय गेम ऑन-द-गो खेळताना युझर्सना सर्वाधिक अडचणी येत होत्या. कमी वेग आणि जास्त विलंब (लॅग) यामुळे गेमिंगप्रेमी ऑन-द-गो अशा खेळांचा उत्तम अनुभव घेऊ शकत नव्हते. त्यासाठी चांगली बँडविड्थची आवश्यकता असते आणि Airtel 5G Plus 30 पट वेगवान स्पीड देऊन ही गरज पूर्ण करते.

घराबाहेर, कमी स्पीडमुळे, गेमिंगप्रेमी त्यांच्या घराच्या चार भिंतीतच मल्टीप्लेअर अनुभवत होते. परंतु Airtel 5G Plus देखील 30 पट स्पीड देऊन या समस्येवर उपाय म्हणून उदयास आले आहे. Airtel 5G Plus च्या नवीन तंत्रज्ञानामुळे, तुम्ही ऑन-द-गो वाय-फायसारख्या स्पीडसह मल्टीप्लेअर गेमिंगचा आनंद घेऊ शकता. यासोबतच यूजर्सना Airtel 5G Plus द्वारे ऑडिओमध्ये उत्कृष्ट कम्युनिकेशन देखील मिळते.

Also Read  Petrol Diesel Rates Today:कडून पेट्रोल-डिझेलचे नवे जर जाहीर; तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोलची किंमत काय?

यासोबत, Airtel 5G Plus गेमिंग जगतात AR आणि VR ची नेक्स्ट लेव्हल आणते. यापूर्वी व्हीआर (व्हर्च्युअल रिअॅलिटी) आणि एआर (ऑगमेंटेड रिअॅलिटी) किंवा एमआर (मिक्स्ड रिअॅलिटी) चा अनुभव तितकासा चांगला नव्हता. परंतु Airtel 5G Plus च्या 30 पट स्पीड, कमी विलंबासह युझर्स आता घराबाहेर देखील AR/VR चा अनुभव घेऊ शकतात.

हे स्पष्ट आहे की Airtel 5G Plus मुळे गेमिंगचे विश्व याआधीपेक्षा अतिशय चांगले बनणार आहे. त्यामुळे, तुम्हाला अधिक चांगला गेमिंग अनुभव मिळवायचा असेल, तर Airtel 5G Plus चा अनुभव घेण्यास उशीर करु नका. Airtel 5G Plus मध्ये अपग्रेड करण्याची प्रक्रिया सोपी आहे, कारण तुम्ही Airtel युझर असाल तर तुमचे सिम आधीच 5G-सक्षम आहे. Airtel 5G Plus च्या 30 पट अधिक वेगासह तुम्ही सुद्धा गेमिंगचा अनोखा अनुभव घेऊ शकता. त्यामुळे, आजच स्विच करा आणि Wi-Fi च्या वेगाप्रमाणेच  Airtel 5G Plus चा ऑन-द-गो अनुभव घ्या. 

Also Read  ipl 2023 released players list:आईपीएल प्लेयर लिस्ट 2023

नियम आणि अटी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[Disclaimer: This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?