Shalarth website वरती पगार बिल कसे तयार करावे. याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. शालार्थ मार्फत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार बिल दर महिन्याला तयार केले जातात. अशी पगारविले कशी बनवायची याबाबत आजच्या लेखांमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आशा करतो की मी सांगितलेली माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल.
How to generate pay bill in shalarth यासाठी आपल्याला सर्वप्रथम शालार्थ पोर्टलवर shalarth.maharashtra.gov.in लॉगिन करावे लागेल. शालार्थ वरती लॉगिन कसे करावे हे जर आपल्याला माहीत नसेल तर मी शालार्थ लॉगिन वरती पोस्ट तयार केलेली आहे ती बघण्यासाठी येथे क्लिक करा. लॉगिन कसे करायचे हे आपल्याला समजल्यानंतर आपण लॉगिन केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसेल.

आता आपण शालार्थ मध्ये लॉगिन झालेला आहे. यामध्ये सर्वप्रथम सुरुवातीचा जो टॅब आहे आहे. तो म्हणजे Worklist या टॅब वर आपण फक्त माऊस कर्सर घेऊन जायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खर्च गेल्यानंतर खालील प्रमाणे विंडो दिसणार आहे. खालील विंडो चे निरीक्षण करा.Worklist मधून आपल्याला पुढे Payroll मध्ये जायचे आहे ते खालील विंडोमध्ये आपल्याला दाखवलेले आहे आपल्याला शालार्थ मध्ये सर्व काम वर्क लिस्ट आणि पेरोल या दोन टॅब मध्ये जास्त काम करायचे आहे.

वरील विंडो मध्ये दाखवलेल्या प्रमाणे बाण दाखवलेले आहेत. त्याप्रमाणे कृती करायची आहे.

आता आपण Payroll वरून पुढील जो पर्याय आहे तो पर्याय म्हणजे. payroll generation view यावरती माऊस कर सर नेऊन क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो दिसणार आहे.

आता आपण खऱ्या अर्थाने पगार बिल जनरेट करण्याच्या पेजवर येऊन पोहोचलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला चार पर्याय निवडायचे आहेत सर्वप्रथम वर्ष निवडा त्यानंतर महिना निवडा हे सर्व वरती विंडोमध्ये बांध दाखवलेले आहेत त्याप्रमाणे त्यानंतर बिल ग्रुप निवडा. आता हे तीन पर्याय निवडल्यानंतर इतर कोठेही क्लिक करू नका. सर्वात खाली जनरेट(Generate) नावाचे ऑप्शन आहे त्यावरती माऊस कर्सर नेऊन क्लिक करा. पाच ते दहा सेकंदांमध्ये आपले बिल जनरेट झालेले असेल.
अशा प्रकारे आज आपण How to generate pay bill in shalarth शालार्थ पोर्टल वरती पगार बिल कसे जनरेट करायचे हे अगदी सविस्तरपणे आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये मी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ही माहिती आपल्याला योग्यरित्या समजली असेल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. अशाच प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित पोस्ट बघण्यासाठी आपला अभ्यास या साईटला नियमित व्हिजिट करा. शालार्थ च्या या अगोदर केलेल्या पोस्ट बघण्यासाठी शालार्थ कॅटेगिरी मधून आपण पोस्ट बघू शकता. धन्यवाद.
अमेझॉन वरती आकर्षक सवलतीसह खरेदी करण्यासाठी -लिंक ला क्लिक करा
Pingback: teacher transfer portal,बदली आदेश कसे डाउनलोड करावे ? - आपला अभ्यास- Aplaabhyas
Pingback: shalarth: बील ग्रुप चे नाव कसे बदलावे ? - आपला अभ्यास- Aplaabhyas