बनाना सिटीत पहिली राज्यस्तरीय केळी परिषद, केळीरत्न पुरस्काराचे होणार वितरण

बनाना सिटीत पहिली राज्यस्तरीय केळी परिषद, केळीरत्न पुरस्काराचे होणार वितरण

Rate this post


Agriculture News : महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं पहिल्या राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन (Banana conference) करण्यात आलं आहे. ही परिषद  23 एप्रिलला जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा (बनाना सिटी)  इथं होणार आहे. या पहिल्या केळी परिषदमध्ये केळीरत्न कार्यगौरव पुरस्कारचे वितरण देखील करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली. तसेच यावेळी केळी क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी वेगवेगळ्या मागण्या देखील करण्यात येणार आहेत. 

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा होणार

केळी उत्पादक शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, गारपीट, बोगस खते, निकृष्ट प्रतिची रोपे, बोगस खते याचबरोबर विमा कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी  चालवलेली शेतकऱ्यांची पिळवणूक याचा सामना केळी उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या सर्व मुद्यांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याची माहिती किरण चव्हाण यांनी दिली. यावेळी केळी क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. राज्यस्तरीय केली परिषदेमध्ये विविध मागण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये केलीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा. केळी हमीभाव मिळावा. तसेच पिक विमा कंपन्यांची मुजोरी थांबावी अशी विविध मागण्या करण्यात येणार आहेत. केळी पिकाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केळीच्या पिकांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. केळीसाठी महागडी खत, निंदणी, ठिंबक, सिंचन ,मल्चिंग पेपर अशा अनेक साहित्य केळी पिकांसाठी लागत आहेत. सध्या मजुरांची मजुरी देखील वाढली आहे. त्यामुळं केळीला हमीभाव मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

Also Read  Market Committee Election:छत्रपती संभाजीनगरमधील बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात; पाहा कुठे काय परिस्थिती

तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार 

या केळी परिषदेमध्ये डॉ. प्रशांत नाईकवाडी हे केळी पिक रोग नियंत्रण आणि सेंद्रीय शेती यावर मार्गदर्शन करणार आहेत. निर्यातक्षम केळी आणि सुक्ष्म अन्नद्रव्य केळीचे महत्व या विषयावर राज इ शाईनचे मार्केंटिंग मॅनेजर नंदलाल वसेकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळं या केळी परिषदेला महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन किरण चव्हाण यांनी केलं. दरम्यान, या केळी परिषदेमध्ये 19 शेतकऱ्यांना 2023 चा केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही परिषद सावदा येथील प्रभाकर महाजन बहुउद्येशिय सभागृहात 23 एप्रिलला 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील उपस्थित राहणार आहेत. 

Also Read  पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी आक्रमक, बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात धडक

महत्त्वाच्या बातम्या:

Banana News : केळीला हमीभाव जाहीर करा, नंदूरबारमध्ये केळी संशोधन केंद्र उभारावं, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?