पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी आक्रमक, बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात धडक

पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी आक्रमक, बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात धडक

Rate this post


Buldhana News : पीक विम्याच्या (Pik Vima) मुद्यावरुन बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज आक्रमक आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलकांनी थेट जिल्हा कृषी अधीक्षकांनाच घेराव घातला आहे. अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळं जिल्हा कृषी कार्यालयात गोंधळ उडाला आहे.

प्रश्न मार्गी लावावा अन्यथा कार्यालयातून जाणार नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) त्यांच्या कार्यकर्त्यांसह अचानक  कृषी कार्यालयात दाखल झाले. कृषी अधीक्षकांनी पीक विम्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा कार्यालयातून जाणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतली आहे.

Also Read  भंडाऱ्यात शेतकऱ्यांसाठी सलाम किसानचा पुढाकार, तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात माती परीक्षण

वेळोवेळी मागणी करुनही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही

वेळोवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दा लावून धरला आहे. यासाठीआंदोलने केली आहेत. तसेच निवेदने देखील देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप 20 हजार शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम बाकी आहे. 20 मार्चपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना कृषी अधीक्षकांनी AIC कंपनीला दिल्या होत्या. मात्र, आज 13 एप्रिल आहे, तरीदेखील कंपनीने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमी केली नाही. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Also Read  Petrol Diesel Rates Today: कच्च्या तेलाचे दर गडगडले Petrol Diesel लवकरच स्वस्त होणार?

आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 1 हजार 611 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेल्या आत्मदहन आणि जलसमाधी आंदोलनांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 1 हजार 611 शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 158 कोटी 98 लाख 66 हजार 522 रुपये मिळाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी अत्यल्प रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यात 7 हजार 513 शेतकऱ्यांना एक हजारापेक्षा कमी पीक विमा मिळाला आहे. तर अनेकांना प्रीमियमपेक्षाही कमी रक्कम मिळाली आहे. त्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा सुरु आहे. वारंवार आम्ही निवेदने देत आहोत. आंदोलन करत आहोत. मात्र, विमा कंपनी तारीख पे तारीख देत आहे. कृषी विभागाचं याकडे दुर्लक्ष असल्याचे तुपकर म्हणाले. सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं तुपकरांनी सांगितले. 

Also Read  Rain: राज्यात विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा

महत्त्वाच्या बातम्या:

Swabhimani Shetkari Sanghatana : पीक विमा कंपन्यांसमोर सरकार झुकतंय, तुपकरांचा आरोप, हिंगोलीच्या कृषी अधिक्षक कार्यालयावर मोर्चा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?