Reason’s For Depression: आपल्या प्रत्येकाला चांगलं आणि आनंदी जगणं आवडतं. त्यामुळे तुम्हाला स्वत: ला जास्तीत आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. यासोबत स्वत: वर प्रेम करणं आणि स्वत: ची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात आणि कोणत्या गोष्टी करायला आवडत नाही? हे आधी स्पष्ट करणं महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की, तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्याच्या भांडगडीत स्वत: चं समस्येच्या गर्तेत अडकून पडता आणि नुकसान करून घेता. यामुळे तुम्ही एकलकोडेंपणा, तणाव आणि नैराश्याला कधी बळी पडलात, हे लवकर समजत नाही. तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर काही गोष्टी जाणीपूर्वक लक्षात ठेवायला हव्यात. अशाच काही लक्षणांची सविस्तर माहिती जाणून घ्या.
या लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करू नका…
1. सतत स्वत: ची चुका काढणे
जर तुम्ही स्वत: ला दुसऱ्यांपेक्षा कमी समजत असाल आणि स्वत:च्या चुका काढत राहिलात तर स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसाल. यामुळे स्वत: चा द्वेषही करायला लागू शकता. त्यामुळे स्वत: ला कधीही दुसऱ्यापेक्षा कमजोर समजू नका.
2. सतत नकारात्मक विचार करणे
तुम्ही सतत नकरात्मक विचार करत असाल तर मानसिकरित्या आजारी पडण्याची शक्यता असते. जसे की, कोणतंही काम करत करण्यापूर्वीच सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक विचार करणे आणि आधीच त्या कामाबाबत उलट-सुलट विचार करणे. असा विचार करत असाल तर आताच थांबवा.
3. सतत स्वत:चे मूल्यमापन करणे
तुम्ही जर इतरांच्या गोष्टी ऐकून प्रभावाखाली येऊन स्वत:चे मूल्यमापन करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतं. अशावेळी तुम्ही इतरांसारखे बनण्यासाठी प्रयत्न कराल आणि स्वत:चचं मोठ नुकसान करून घ्याल. त्यामुळे इतरांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वत:चं सतत मूल्यमापन करणे टाळा.
4. स्वप्नांना खरं समजणं
आपण पाहतो की, अनेकजणांना झोपेत विचित्र स्वप्न पडल्यामुळे लक्ष विचलित होतं आणि लोकांना हे खरं वाटायला लागतं. त्यामुळे अशा स्वप्नांना सत्य समजू नका. उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत पुढे जात राहा. स्वत: ला सतत वास्तव स्वप्नांची आठवण करून द्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )