Google play store: गुगल (goole) हे रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. गुगलची प्रत्येक सेवा ही सामान्य माणसांच्या आयुष्यात फार महत्त्वाची भूमिका बजावते. गुगलची सेवा अगदी काही काळासाठी जरी ठप्प झाली तर संपूर्ण जगभरात त्याचे पडसाद उमटतात. आज सकाळी गुगल च्या प्ले स्टोरची सेवा अशीच ठप्प झाली होती. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत जगभरातल्या युजर्ससाठी गुगल प्ले (google play store) स्टोरची सेवा ठप्प झाली होती. युजर्स (users) प्ले स्टोकमधून कोणतेही ऍप डोऊनलोड करु शकत नव्हते. परंतु आता गुगलची ही ठप्प झालेली सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की, काही तांत्रिक कारणांमुळे काही लोकांच्या फोनमध्ये ही अडचण निर्माण झाली होती.
बऱ्याच लोकांना गुगल प्ले स्टोरवरुन ऍप (app) डाऊनलोड करण्यास अडचणी येत होत्या. कोणत्याही प्रकारचे ऍप बऱ्याच युजर्सना डाऊनलोड करता येत नव्हते. ते ऍप डाऊनलोड करताना एकतर तांत्रिक अडचणी येत होत्या किंवा प्ले स्टोर सुरुच नव्हते होत. तेव्हा मात्र गुगल प्ले स्टोरच्या या स्थितीबाबत युजर्सनी तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली.
2500 लोकांनी केल्या तक्रारी..
सकाळी जेव्हा गुगल प्ले स्टोरची सेवा ठप्प झाली होती तेव्हा युजर्सना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे युजर्सनी तात्काळ गुगलवर तक्रारी करण्यास सुरुवात केली. निर्माण झालेल्या अडचणींमुळे युजर्सना बराच वेळ त्रस्त होते. परंतु जेव्हा याबद्दल तक्रार करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की जगभरात ही अडचण निर्माण झाली आहे.
गुगलकडून तक्रारींची दखल…
गुगल आपल्या युजर्सच्या अडचणी सोडवण्यात कधीच उशीर करत नाही. आजही जेव्हा ही सेवा ठप्प झाली होती तेव्हा गुगलवर अनेक तक्ररारी येऊ लागल्या. या तक्रारींची दखल देखील गुगलकडून घेण्यात आली. काहीच वेळात गुगलकडून प्ले स्टोरची सेवा सुरळीत करण्यात आली. परंतु तरीही काही नागरिकांना अजूनही प्ले स्टोर वापरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्ले स्टोर चालवण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
अजूनही काही प्रमाणात अडचण येत असल्यास या गोष्टी करुन पहा..
-
- मोबाईल फोनला काही वेळासाठी फ्लाईट मोडवर टाका
-
- तरीही सेवा सुरु होत नसेल तर फोन बंद करुन पुन्हा सुरु करावा
हे देखील वाचा
Pune-Latur-Pune Railway : पुणे-लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-लातूर-पुणे रेल्वे सुरु होणार, प्रवाशांना मोठा दिलासा
l