‘एवढा पगार देऊ शकाल? माझा पगार तुम्ही उभारलेल्या फंडपेक्षा जास्त’; CEOची पोस्ट चर्चेत

‘एवढा पगार देऊ शकाल? माझा पगार तुम्ही उभारलेल्या फंडपेक्षा जास्त’; CEOची पोस्ट चर्चेत

Rate this post

Trending News: सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका कंपनीच्या फाउंडर आणि सीईओची (CEO) एक पोस्ट व्हायरल होत आहे. या सीईओनं एका महिलेला नोकरीची ऑफर दिली होती. पण त्याला महिलेनं दिलेलं उत्तर मात्र चर्चेचा विषय ठरतंय. ही घटना तब्बल दोन वर्षांपूर्वीची आहे. कंपनीचे सीईओ आज दोन वर्षानंतरही महिलेनं दिलेलं उत्तर विसरु शकलेले नाही. तो आजही महिलेच्या उत्तराचा विचार करत आहे. सीईओचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

एका कंपनीच्या संस्थापक आणि सीईओनं एका महिलेला नोकरीची ऑफर दिली. ही महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) होती. सीईओनं महिलेला विचारलं होतं की, तुम्हाला माझ्या कंपनीत काम करण्यात रस आहे का? मात्र महिलेनं दिलेल्या उत्तरानं सीईओला विचार करण्यास भाग पाडलं. महिलेनं सीईओसमोर अत्यंत प्रामाणिकपणे आपला मुद्दा मांडला होता. खरं तर, हेल्थकेअर स्टार्टअप वॉलनटचे (Walnut)  फाउंडर आणि सीईओ रोशन पटेल (Roshan Patel) यांनी दोन वर्षांपूर्वी एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला नोकरीची ऑफर दिली होती.

Also Read  Dabur Honey Sundarbans-500gm: 100% Pure Wild Forest Honey | Raw, Unprocessed | Naturally rich in Antioxidants

दोन वर्षांपूर्वीची घटना 

वॉलनटचे फाउंडर आणि सीईओ रोशन पटेल यांनी सांगितलेला किस्सा 2021 चा आहे. त्यानंतर वॉलनटने प्री-सीड राउंडमध्ये निधी उभारला. तेव्हा रोशन पटेल आपली टीम वाढवण्याचा विचार करत होते. त्याला त्याच्या स्टार्टअपसाठी सक्षम लोकांची गरज होती. यादरम्यान त्यांनी एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला नोकरीची ऑफर दिली. पटेल यांनी लिहिलं की, “माझ्याकडे एक स्टार्टअप आहे, जो हेल्थकेअर बजेटला अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही अलीकडेच प्री-सीड राउंड ऑफ फंडिंग वाढवलं ​​आहे. आम्हाला हुशार इंजिनिअर्सची गरज आहे. यासंदर्भात आपण बोलू शकतो का?”

Also Read  कोकणात किनाऱ्यावर क्रिकेट खेळत आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेत सचिनने साजरा केला वाढदिवस

महिलेचं सीईओला उत्तर…

महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरनं रोशन पटेल यांना उत्तर देताना लिहिलं की, तिचा सध्याची सीटीसी (CTC) वॉलनटच्या प्री-सीड राउंडमध्ये जमा झालेल्या फंडपेक्षा जास्त आहे. तेव्हापासून रोशन पटेल महिलेनं दिलेल्या उत्तराचाच विचार करत आहे. महिला इंजिनिअरनं रोशन पटेल यांना दिलेल्या उत्तरात लिहिलं होतं की, “हाय रोशन, मी आत्ताच क्रंचबेस वर चेक केलं आणि माझा सध्याचा पगार तुमच्या संपूर्ण प्री-सीड राउंड फंडपेक्षा जास्त आहे.” महिलेचं हे उत्तर रोशन पटेल यांनी सोशल मीडियावरही शेअर केलं आहे. शेअर करताना रोशन पटेल यांनी लिहिलंय की, मी अजूनही दोन वर्षांपूर्वी झालेल्या या संवादाचा विचार करत आहे. पटेल यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Also Read  IPL 2023 Points Table :विजयासह मुंबई आणि पंजाबची गुणतालिकेत उडी; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?

4 thoughts on “‘एवढा पगार देऊ शकाल? माझा पगार तुम्ही उभारलेल्या फंडपेक्षा जास्त’; CEOची पोस्ट चर्चेत”

  1. Pingback: Medicine:48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल, तुम्ही घेत असलेली औषधं यापैकीच तर नाही ना? तपासून पहा - आपला अभ्यास-

  2. Pingback: Citroën India कडून नवीन C3 Shine टॉप व्हेरियंट लाँच, काय आहेत वैशिष्ट्ये? - आपला अभ्यास- Aplaabhyas

  3. Pingback: Freedom hero Rajguru:स्वातंत्र्यवीर राजगुरू - आपला अभ्यास- Aplaabhyas

  4. Pingback: Maharashtra Day: महाराष्ट्राची नऊवारी! तरुणींचा कल आजही मराठमोळ्या वस्त्राकडे; काय आहे नऊवारीचा इतिहास? प

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?