आज शेअर बाजार बंद; बँकांसह सरकारी कार्यालयांनाही सुट्टी

आज शेअर बाजार बंद; बँकांसह सरकारी कार्यालयांनाही सुट्टी

Rate this post

Banks and Stock Market Closed Today: आज 14 एप्रिल म्हणजेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती (Dr. Bhim Rao Ambedkar Jayanti) . आज शेअर बाजार बंद असणार आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदार BSE आणि NSE वर (BSE and NSE) व्यवहार करू शकणार नाहीत. शेअर बाजाराच्या एप्रिल 2023 च्या हॉलिडेच लिस्टनुसार आणि BSE वेबसाइट bseindia.com वर अपडेट केलेल्या माहितीनुसार, भारतीय शेअर बाजारात (Stock Market Closed)  आज कोणतीही ट्रेडिंग अ‍ॅक्टिव्हिटी होणार नाही.

अनेक ठिकाणी बँका आणि सरकारी कार्यालयंही बंद राहतील. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी असेल. दुसरीकडे, बाबासाहेब आंबेडकर जयंती व्यतिरिक्त काही राज्यांमध्ये वैशाखी, तामिळ नववर्ष दिन, चिरवाबा, बिजू महोत्सव आणि बोहाग बिहू निमित्त सुट्टी असेल. बँका फक्त शिलाँगमध्येच सुरू राहतील.

Also Read  शहापूर तालुक्यात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग, तीन महिन्यात पाच लाखांचा नफा

एमसीएक्स, एनसीडीईएक्सवरही व्यवहार नाही 

कमोडीटी मार्केटही आज पूर्णपणे बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत येथेही कोणाताही व्यवहार होताना दिसणार नाही. मल्टी कमोडिटी मार्केट अंतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींत कोणताही बदल होणार नाही.

एप्रिलमध्ये शेअर बाजाराच्या हॉलिडे लिस्टमध्ये तीन सुट्ट्या

शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये शेअर बाजार तीन दिवस बंद आहे. गुड फ्रायडे म्हणजे, एप्रिलची दुसरी सुट्टी होती. यापूर्वी 4 एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होतं आणि आज 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी आहे.

Also Read  Smart Investment: PPF गुंतवणूक फायदेशीर जाणून घ्या फायदे 

बाजारातील सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाईट www.bseindia.com ला भेट देऊ शकता. डिपॉझिटरी डेटानुसार, फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात एकूण 11.25 कोटी खाती आहेत. कोरोनानंतर डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

शेअर मार्केट बंद असल्यामुळे इतर व्यवहारही बंद राहणार 

कोणताही गुंतवणूकदार इक्विटी विभागात व्यापार करू शकणार नाही. दुसरीकडे, जर एखाद्यानं शेअर्स विकण्याची किंवा खरेदी करण्याची विनंती केली असेल, तर त्याचा पोर्टफोलिओ आज अपडेट केला जाणार नाही. याशिवाय कमोडिटी मार्केटही बंद राहणार आहे, म्हणजेच सोन्या-चांदीचे दरही अपडेट होणार नाहीत. तथापि, MCX आणि NCDEX संध्याकाळच्या व्यवहारादरम्यान खुले राहतील.

Also Read  RR vs SRH, IPL 2023 : थरार...! अखेरच्या चेंडूवर षटकार, हैदराबादचा राजस्थानवर 4 विकेटने विजय

कुठे बँका बंद असणार? 

आगरतळा, अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, आंध्र प्रदेश, हैदराबाद, इंफाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी बँका आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?