Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कधी अवकाळी पाऊस ( Unseasonal rain) पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील (western Maharashtra) सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यासह मराठवाड्यातील (Marathwada) लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणवत आहे.
दरम्यान, आजपासून (16 एप्रिल) संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित असलेलं अवकाळी वातावरण निवळण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणातील चार आणि विदर्भातील 11 अश्या एकूण 15 जिल्ह्यात 16 आणि 17 तारखेला वातावरण निवळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील 10, मराठवाड्यातील 8 अशा एकूण 18 जिल्ह्यात अजुनही रविवार 23 एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता टिकून असल्याचे खुळे यांनी सांगितले.
उष्णतेत वाढ होण्याची शक्यता
मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी होणारा पूर्व-मोसमी (15 ते 20 मे नंतरचा) व सध्याच्या (मार्च-एप्रिल मधील) होणाऱ्या अवकाळी पावसात साध्यर्मता दिसत आहे. मात्र, त्यांचे स्वरूप त्या पाठीमागील वातावरणीय प्रणाली कारणेही पूर्णपणे वेगळी असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची काहिली वाटत असली तरी सदर तापमान सरासरीइतकेच जाणवत आहे. येत्या एक ते दोन दिवसात या उष्णतेत साधारण तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होवू शकते असा अंदाज माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: