Foods For Healthy Heart : सध्या हृदयविकाराच्या समस्या (Heart Attack) तरुण वयातच दिसून येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये, हृदयविकाराचा धोका देखील वाढला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपली बिघडलेली जीवनशैली आणि अयोग्य आहार. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम, धूम्रपान, दारूचे सेवन ही हृदयविकाराची काही प्रमुख कारणे आहेत. जर तुम्हाला दीर्घकाळ हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर आजपासूनच या 5 आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.
अक्खे दाणे (Whole grains)
अक्खे दाणे, तपकिरी तांदूळ आणि क्विनोआसारखे संपूर्ण धान्य फायबरचे चांगले स्रोत आहेत. ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे खनिजे देखील भरपूर प्रमाणात आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
जवस (Flaxseeds)
रोज एक चमचा जवस खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन, यूएस मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज चार चमचे फ्लेक्स बियाणे उच्च रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी करू शकतात. अभ्यासानुसार, जवसाच्या बियांमध्ये आढळणारे अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हृदयरोग्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
ड्रायफ्रूट्स (Dryfruits)
ड्रायफ्रूट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. यामध्ये फायबर देखील उपलब्ध आहे. हे सर्व घटक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. बदाम, अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये अँटिऑक्सिडेंट आणि खनिज गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तदाबाचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
सोया (Soya foods)
टोफू, टेम्पेह, एडामामे आणि सोया दूध यांसारखे सोया पदार्थ हृदयाला निरोगी ठेवतात. यामध्ये कोलेस्टेरॉल कमी करण्याचा प्रभाव दिसून येतो. यामध्ये सॅच्युरेटेड फॅटची पातळी खूपच कमी असते.
बीटचा ज्यूस (Beetroot juice)
बीटचा ज्यूस रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी ओळखला जातो. हे निरोगी हृदयासाठी चांगले आहे. त्यात नायट्रेट (NO3) आढळते, ज्यामध्ये उच्च रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या अभ्यासानुसार, दररोज एक ग्लास बीटरूटचा रस प्यायल्यास रक्तवाहिन्यांमधील जळजळ होण्याची लक्षणे कमी होऊ शकतात. जे कोरोनरी हृदयरोगासाठी ओळखले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Health Tips : फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या ‘या’ वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर

Check Your Internet speed Check Now
Pingback: Mothers Day:मातृदिन हा मातांचा आणि मातृत्वाचा असतो - आपला अभ्यास- Aplaabhyas