व्हॉट्सअ‍ॅपकडून नवीन सिक्युरिटी फीचर्स लाँच; अकाऊंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार

व्हॉट्सअ‍ॅपकडून नवीन सिक्युरिटी फीचर्स लाँच; अकाऊंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार

Rate this post

Stay Safe with WhatsApp : Whatsapp ने आपल्या यूजर्ससाठी नवीन सिक्युरिटी फिचर्स आणलं आहे. या नवीन सिक्युरिटी फिचर्समुळे तुमचे अकाउंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. या फिचर्समध्ये Account Protect, Device Verification आणि Automatic Security Codes इत्यादींचा समावेश असणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपने अलीकडेच ‘Stay Safe with WhatsApp’ मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये यूजर्संना सिक्युरिटी फिचर्स आणि टूल्सची माहिती मिळणार ​​आहे. ही मोहीम जवळपास 3 महिने सुरु राहणार आहे.

WhatsApp ने आपल्या नवीन ब्लॉग पोस्टद्वारे नव्या सिक्युरिटी फिचर्सबद्दल माहिती दिली आहे. Account Protect, Device Verification आणि Automatic Security Codes फिचर्स युजर्सच्या व्हॉट्सअ‍ॅप  अकाउंटला सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीपेक्षा अधिक मजबूत करेल. यामुळे ऑनलाईन घोटाळे, फसवणूक आणि अकाऊंटमध्ये होणारी छेडछाड यांसारखे धोके टाळण्यास मदत होणार आहे.

Also Read  whatspp dp : व्हाट्सएप का नया फीचर

अकाऊंट प्रोटेक्ट

Account Protect फिचर तुमच्या WhatsApp अकाऊंटमध्ये एका डिव्‍हाइसवरून दुसऱ्या डिव्‍हाइसवर अनधिकृत लॉगिन होण्‍यास प्रतिबंध करतो. हे फिचर सुरू झाल्यानंतर, जर कोणी दुसऱ्या डिव्हाइसवरुन तुमच्या WhatsApp खात्यात लॉगइन केलं, तर लॉगइन करण्यापूर्वी जुन्या डिव्हाइसवरून त्याचं अप्रूव्हल मागितलं जाणार आहे. याचा फायदा असा होणार की, जर कोणी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या डिव्हाइसवर सुरु करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेचच याबाबतचा अलर्ट मिळणार आहे.

Also Read  Old Pension Scheme : तासाभरात संप मागे घेणार? सरकार अन् संपकऱ्यांमध्ये यशस्वी तोडगा- सूत्र

डिवाइस वेरिफिकेशन

मालवेअर हा सध्या मोबाईल उपकरणांसाठी सर्वात मोठा धोका मानला जातोय. Device Verification फिचर तुमच्‍या डिव्‍हाइसचे मालवेअरपासून संरक्षण करते. Device Verification हे फीचर मालवेअरला तुमच्या डिव्हाइसचा वापर करुन कोणालाही संदेश पाठवण्यापासून रोखतो.

ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड

Automatic Security Codes अंतर्गत, व्हॉट्सअ‍ॅप ने “Key Transparency” नावाचा एक नवीन फिचर सादर केला आहे. हे फिचर युजर्संना Encryption tab वर क्लिक करुन ऑटोमॅटीकली सुरक्षित कनेक्शन व्हेरिफाय करण्याची अनुमती देतो.

Also Read  भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी आजच करा तयारी, पण कशी? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप आणणार भन्नाट फीचर, कंटेट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरणार

दरम्यान, या आधी अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ने आपल्या युझर्ससाठी भन्नाट फीचर आणणार आहे. या भन्नाट फीचरमुळे युजर्स आपले व्हॉट्सअ‍ॅप  स्टेटस  (WhatsApp Status) थेट फेसबुकवर (Facebook) पोस्ट करु शकतात. या व्हॉट्सअ‍ॅप फीचरमधील चांगली गोष्ट म्हणजे युजर्सना आपल्या प्रत्येक स्टोरीसाठी सेटिंग्समध्ये बदल करण्याची सुविधा देण्याता आली आहे. जर तुम्हाला एकच स्टेटस फेसबुकवर शेअर करायचं असेल आणि दुसरं तर तर ही फारच सोप गोष्ट असणार आहे. मात्र, सध्या या फीचरवर काम सुरु असून लवकरच ते लॉन्च होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?