लॉर्ड शार्दूलच्या वादळानंतर फिरकीचा तडाखा, कोलकात्याचा आरसीबीवर विराट विजय

लॉर्ड शार्दूलच्या वादळानंतर फिरकीचा तडाखा, कोलकात्याचा आरसीबीवर विराट विजय

Rate this post


KKR vs RCB, Match Highlights : लॉर्ड शार्दूल ठाकूर याच्या वादळी अर्धशतकानंतर फिरकीच्या तडाख्यात आरसीबीचा संघाची दाणादाण उडाली. एकतर्फी सामन्यात कोलकात्याने आरसीबीचा 81  धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 123 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीला संपूर्ण 20 षटकेही फलंदाजी करता आली नाही. कोलकात्याच्या फिरकीसमोर आरसीबीचा डाव कोसळला. 

केजीएफ फ्लॉप – 
205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी वादळी सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासूनच दोघांनी कोलकात्याच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी 4.5 षटकात 44 धावांची सलामी दिली. विराट कोहली 21 धावा काढून बाद झाला. विराटनंतर फाफही फार काळ मैदानावर टिकला नाही. फाफही 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल यानेही विकेट फेकली. मॅक्सवेल याला फक्त पाच धावा करता आल्या. महत्वाचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी कोलमडली. 

आरसीबीची फलंदाजी ढासळली – 
विराट-फाफ आणि मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मिचेल ब्रेसवेल याने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण 19 धावांवर त्याची खेळी संपुष्टात आली. हर्षल पटेल याला खातेही उघडता आले नाही. शाहबाज अहमद 1, दिनेश कार्तिक 9, अनुज रावत 1 आणि कर्ण शर्मा 1 यांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. 

Also Read  Yashasvi Jaiswal IPL 2023 :कधीकाळी मुंबईत पाणीपुरी विकली, आता आयपीएलमध्ये झळकावले शतक

आकाशदीप-डेविड विलीमुळे लाज वाचली – 
आकाशदीप आणि डेविड विली यांनी दहाव्या विकेटसाठी केलेल्या भागिदारीमुळे आरसीबीवरील मोठी नामुष्की टळली. आरसीबीने 96 धावांत 9 विकेट गमावल्या होत्या. आकाशदीप आणि डेविड विली यांनी 27 धावांची भागिदारी केली. डेविड विली याने 20 धावांचे योगदान दिले. तर आकाशदीप याने 17 धावांचे योगदान दिले. 

 फिरकीच्या जाळ्यात अडकला आरसीबी – 

विराट कोहली आणि फाफ यांनी तुफानी सुरुवात केली होती. पण कोलकात्याच्या फिरकीच्या जाळ्यात आरसीबीचा संघ अडकला. कोलकात्याच्या तीन फिरकी गोलंदाजांनी आरसीबीच्या 9 फलंदाजांना बाद केले. यामध्ये वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर युवा सुयेश शर्मा याने तीन विकेट घेतल्या. अनुभवी सुनील नारायण याने दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्ती याने 3.4 षटकात 15 धावा खर्च केल्या. सुयेश शर्मा याने चार षटकात 30 धावा दिल्या. सुनील नारायण याने चार षटकात फक्त 16 धावा दिल्या. शार्दुल ठाकूर याने फंलदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल केली. शार्दुल ठाकूर याने दोन षटकात 15 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.

दरम्यान, रहमानुल्लाह गुरबाजची दमदार सलामी आणि लॉर्ड शार्दुलच्या फिनिशिंगच्या जोरावर कोलकाताने निर्धारित 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. लॉर्ड शार्दुल ठाकूर याने 68, रहमानुल्लाह गुरबाज याने 57 तर रिंकू सिंह याने 46 धावांची खेळी केली. आरसीबीकडून डेविड विली आणि कर्ण शर्मा यांनी भेदक मारा केला. 

Also Read  KKR vs GT : गुजरात संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

रहमानुल्लाह गुरबाजचे अर्धशतक – 
एका बाजूला विकेट पडत असताना सलामी फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने संयमी खेळी केली. रहमानुल्लाह गुरबाज याने 44 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले. संघातील आघाडीचे फलंदाज बाद होत असताना रहमानुल्लाह गुरबाज याने धावसंख्या हालती ठेवली. रहमानुल्लाह गुरबाज याने 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 57 धावंची खेळी केली. 

शार्दुलचा फिनिशिंग टच – 

आंद्रे रसेल बाद झाल्यानंतर लॉर्ड शार्दुल ठाकूर मैदानात आला. कोलकात्याचा संघ अडचणीत होता. रसेलने निराश केल्यानंतर शार्दुल ठाकूर याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शार्दुल ठाकूर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. शार्दुलने मैदानाच्या चोहूबाजूने चौकार आणि षटकार लगावले. शार्दुल ठाकरू याने 29 चेंडूत 68 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान शार्दुल ठाकूर याने तीन षटकार आणि 9 चौकार लगावले. शार्दुलच्या विस्फोटक खेळीमुळे कोलकाता संघाने 200 धावांचा पल्ला ओलांडला. 

रिंकूची चांगली साथ – 

शार्दूल ठाकूर याने आक्रमक रुप धारण करत धावांचा पाऊस पाडला. मैदानाच्या चोहूबाजूने चौकार आणि षटकार लगावत असलेल्या शार्दूल ठाकूरला रिंकूने चांगली साथ दिली. रिंकूने 33 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. अखेरच्या षटकात धावा चोपण्याच्या नादात रिंकू सिंह बाद झाला. 

दिग्गजांचा फ्लॉप शो – 
आरसीबीच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याच्या फलंदाजांनी नांगी टाकली. वेंकटेश अय्यर, मनदीप सिंह, कर्णधार नितीश राणा, आंद्रे रसेल यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. वेंकटेश अय्यर 3 आणि नितीश राणा 7 धावा काढून बाद झाले. तर विस्फोटक आंद्रे रसेल आणि मनदीप सिंह यांना खातेही उघडता आले नाही. दिग्गज फलंदाज बाद झाल्यामुळे कोलकात्याचा संघ अडचणीत सापडला होता. पण शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी दमदार भागिदारी करत कोलकात्याचा डाव सावरला. 

Also Read  old pension scheme for government employees:

रिंकू-शार्दुलची निर्णायक शतकी भागिदारी – 

कोलकात्याचा अर्धा संघ 90 धावांच्या आत तंबूत परतल्यानंतर रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी दमदार फलंदाजी केली. शार्दुल ठाकूर याने धावांचा पाऊस पाडला तर रिंकूने शार्दुल याला चांगली साथ दिली. दोघांनी धावांचा पाऊस पाडत शतकी भागिदारी केली. केकेआर 150 धावांपर्यंत जाईल की नाही, यात साशंकता होती. पण शार्दुल आणि रिंकू यांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकाताने 200 धावांचा पल्ला पार केला. रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी 47 चेंडूत 103 धावांची भागिदारी केली. शार्दूल आणि रिंकू यांच्या भागिदारीमुळे कोलकात्याने दमदार पुनरागमन केले. 

कोलकात्याची गोलंदाजी कशी ?

कोलकात्याकडून डेविड विली आणि कर्ण शर्मा यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. डेविड विली याने चार षटकात 16 धावा दिल्या. तर कर्ण शर्मा यानेतीन षटकात 26 धावा खर्च केल्या. मेहम्मद सिराज आणि हर्षल पटेल महागडे गोलंदाज ठरले. सिराजने चार षटकात 44 धावा खर्च केल्या. तर हर्षल पटेल याने तीन षटकात 38 धावा केल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?