Renault Kiger 2023: रेनॉल्ट इंडियाने (Renault India) आज आपल्या रेनॉल्ट किगर (Renault Kiger) कारची अपडेटेड एडिशन लॉन्च केली आहे. ग्राहकांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी अनेक फिचर्स लॉन्च करण्यात आले आहेत. सर्व नव्या फिचर्ससह कंपनी आपल्या नवीन कारवर उत्तम ऑफर देखील देत आहे. जाणून घेऊया काय आहेत रेनॉल्टच्या नवीन गाडीवरील ऑफर्स…
डिस्काऊंट ऑफर्स
रेनॉल्ट किगर (Renault Kiger) ही कार खरेदी केल्यावर, ग्राहकांना 20,000 रुपयांचे एक्सचेंज बेनिफिट मिळणार आहेत. कारच्या खरेदीवर 10,000 रुपयांची रोख सूट मिळणार आहे, तर अतिरिक्त 12,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील मिळणार आहे. जर तुम्ही रेनॉल्टचे आधीचे ग्राहक असाल तर तुम्हाला 49,000 रुपयांपर्यंतचे लॉयल्टी फायदे देखील मिळू शकतात.
नवीन रेनॉल्ट किगर RXT (O) 2023
कंपनीने आपल्या नवीन रेनॉल्ट किगर कारच्या RXT (O) व्हेरियंटमध्ये वायरलेस 8.0 इंच टचस्क्रीन, एलईडी हेडलॅम्प-टेल लॅम्प, 16-इंच अलॉय-व्हील्स सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. कंपनीने ही कार 7.99 लाख रुपये एक्स-शोरूम किमती(Ex Showroom Price)त सादर केली आहे.
पॉवर ट्रेन
नवीन रेनॉल्ट किगर (Renault Kiger) कारच्या इंजिन (Engine) बद्दल बोलायचे झाले तर ही कार दोन इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये पहिले 1.0L टर्बो पेट्रोल (Turbo Petrol) आणि दुसरे 1.0L एनर्जी पेट्रोल (Energy Petrol) इंजिन आहे. त्याच्या ट्रान्समिशन (Transmission) बद्दल बोलायचे झाले तर, त्यात 5 स्पीड इझी आर ऑटोमॅटिक आणि आणखी एक एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी युनिट उपलब्ध आहे. कंपनीने या कारसाठी 20.62 किलोमीटर प्रति लिटर मायलेजचा दावा केला आहे.
सेफ्टी फिचर्स
रेनॉल्ट किगर (Renault Kiger) 2023 मध्ये दिलेल्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यां (Safety Feautures) बद्दल सांगायचे तर, यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि रेडी प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय यात फ्रंट-साइडमध्ये 4 एअरबॅग (Air bag), स्पीड सेन्सिंग डोअर-लॉक (Speed sensing Door Lock) आणि चाइल्ड सेफ्टी फीचर ISOFIX आहे.
बाजारपेठेत या कारसोबत आहे मुकाबला
रेनॉल्ट किगरशी स्पर्धा करणाऱ्या कारमध्ये निसान मॅग्नाइट, टाटा पंच, सिट्रोएन सी3, टाटा अल्ट्रोझ, टाटा टिगोर सीएनजी, मारुती सुझुकी बलेनो आणि किया सॉनेट यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
Mahindra Thar : महिंद्रा थारचे लवकरच नवीन डिझाइन; आंतरराष्ट्रीय बाजारात लाँचिंगसाठी तयार
Car loan Information:
Calculate Car Loan EMI
Pingback: Success Story:पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या लागवडीतून लाखोंचे उत्पन्न; शिक्षकाकडून वडिलोपार्जित जमिनी
Pingback: IPL 2023: अटीतटीच्या लढतीत कोलकात्याचा पाच धावांनी विजय - आपला अभ्यास- Aplaabhyas