तुम्हाला मुंबईतील अॅपल स्टोअरच्या 5 युनिक गोष्टी माहिती आहेत काय?

तुम्हाला मुंबईतील अॅपल स्टोअरच्या 5 युनिक गोष्टी माहिती आहेत काय?

Rate this post

Apple Store in Mumbai:  मुंबईत अॅपल स्टोअरच्या (Apple Store) लॉंचिंगपासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. इंटरनेटवर स्टोअरचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झाल्याचं दिसून येतं आहे. या अधिकृत स्टोअरला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कसं  दिसतं आणि त्यात काही युनिक गोष्टी आहेत का?  याबाबत लोकांमध्ये असलेलं प्रचंड आकर्षण आहे. मुंबईत जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये (Jio world drive mall) स्टोअरला सुरूवात करण्यात आली आहे.  हे स्टोअर दिसायल अत्यंत सुंदर आणि आकर्षक असून मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीपासून प्रेरणा घेण्यात आली आहे. या स्टोअरची अंतर्गत रचना जगातील इतर स्टोअरपेक्षा अत्यंत युनिक आहे. अॅपल स्टोअरच्या 5 युनिक गोष्टींबद्दल जाणून घ्या…

Also Read  New Jobs In Phone Manufacturing केंद्र सरकारच्या पीएलआय योजनांमुळे स्मार्टफोन निर्मितीमधून दीड लाखांवर नोकऱ्यांची अपेक्षा

स्टोअरचं सौंदर्य वाढवणाऱ्या काही खास गोष्टी

1. अॅपल स्टोअरची रचना अत्यंत हटके आणि चांगली आहे. कारण स्टोअरच्या आत स्वच्छ सुर्यप्रकाश पडेल अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रकाशात काम करता येतं. त्यामुळे दिवसभर एलईडी बल्ब किंवा ट्युबलाईटची गरज नाही.

2. तुम्हाल स्टोअरमध्ये अॅपलचे सर्व प्रॉडक्ट्स पाहायला मिळतील. जे की अॅपलकडून नेहमी लाँच केले जातात. यामध्ये अॅपलच्या स्मार्टवॉचच्या कव्हरपासून तर लेटेस्ट मॅकबुक, मोबाईलपर्यंत सर्व पाहायला मिळेल. या स्टोअरमध्ये तुम्हाला काही युनिक डिझाईन्स, कलर्स आणि स्टोरेज व्हेरियंट असलेले प्रॉडक्ट्स दिसून येतील. तसेच,  तुम्हाला नेहमी थर्डपार्टीकडून दिसणारा मॅक स्टुडिओ आणि डिस्प्ले या ठिकाणी पाहू शकता. हे विशेष आहे.

Also Read  iphon14 ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्यास सर्वात स्वस्त मिळू शकतो

3. या स्टोअरमध्ये 20 भाषेचं ज्ञान असणारे 100 टीम मेंबर्स ग्राहक सेवेसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे चांगला कस्टमर सपोर्ट मिळणार आहे.

4. तुम्हाला आजपर्यंत अॅपलचे प्रॉडक्ट्स थर्ड पार्टी रिटेल स्टोअरमधून खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष वापरता येत होते. पण आता प्रत्यक्ष स्टोअरमध्ये आरामात बसून प्रॉडक्ट्स वापरता येईल आणि मगच खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. यामध्ये अॅपलचा मोबाईल, इअर बड्स, वायरलेस होमपॉड  (Wireless homepod), लॅपटॉप आणि कम्प्युटर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

5. या स्टोअरची आणखीन एक खासियत अशी आहे की, तुम्हाला या रिटेल स्टोअरच्या आत हिरवीगार झाडे पाहायला मिळणार आहेत. या झाडांमुळे स्टोअर दिसायल एकदम युनिक आणि अट्र्रॅक्टिव्ह दिसतं. त्यामुळे स्टोअरमध्ये गेल्यानंतर लोकांना प्रसन्न आणि आनंददायी वातावरण अनुभवायला मिळणार आहे.  हीच गोष्ट स्टोअरला जगातील इतर स्टोअरपासून युनिक बनवते. हे स्टोअर मुंबईच्या बीकेसीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये अकरा वर्षाच्या भाडेकरारावर घेतले आहे.

Also Read  अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, गुंतवणुकीबाबत म्हणाले...

 20 एप्रिल रोजी दिल्लीत दुसऱ्या स्टोअरचं लाँचिंग

अॅपलने मुंबईत पहिले स्टोअर ओपन केल्यानंतर 20 एप्रिल रोजी दिल्लीत दुसरे स्टोअर लाँच करण्यात आले आहे. दिल्लीच्या साकेत या ठिकाणी सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये स्टोअर सुरू झाले आहे. हे स्टोअर 10,000 स्क्वेअर फूटच्या परिसरात पसरलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?