उच्च शिक्षण घेऊन नोकरी नाही, बीडच्या तरुणानं सुरु केला दूध व्यवसाय; महिन्याला मिळवतोय 50 हजार

उच्च शिक्षण घेऊन नोकरी नाही, बीडच्या तरुणानं सुरु केला दूध व्यवसाय; महिन्याला मिळवतोय 50 हजार

Rate this post

Beed News : उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यानं अनेक तरुण हे व्यवसायाच्या शोधात असतात. अशाच एका उच्च शिक्षण घेतलेल्या बीड (Beed) जिल्ह्यातील तरुणाने दूध व्यवसाय (Dairy Business) करत स्वत:ची प्रगती केली आहे. बीडमधल्या काथवटवाडी येथील चंद्रसेन पारखे असं या तरुणाचे नाव आहे. चंद्रसेन यांचे डीएडचं शिक्षण झालं आहे. मात्र, नोकरी मिळत नसल्यानं त्यांनी स्वतःचं दुधाचा व्यवसाय सुरु केला. याच व्यवसायातून ते नोकरदारापेक्षाही जास्त पैसे कमवत आहेत.

नोकरी मिळत नसल्याने 2014 साली चंद्रसेन पारखे यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी सहा म्हशी घेतल्या होत्या. त्यातून 30 ते 40 लिटर दुधाची विक्री ते करु लागले. दुधाच्या व्यवसायामध्ये चांगले पैसे मिळू शकतात असं त्यांना वाटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हशी बरोबरच त्यांनी गाई देखील विकत घेतल्या.

Also Read  श्रीगोंदा तालुक्यातल्या युवा शेतकऱ्यानं केली पिवळ्या कलिंगडाची लागवड, शहरी भागात मोठी मागणी

दररोज डेअरीला 150 लिटर दूध, महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांचा नफा

सध्या चंद्रसेन पारखे यांच्याकडे सात गाई आणि आठ म्हशी तसेच छोटी मोठी मिळून एकूण 32 जनावरं आहेत. दररोज गाईचे 100 लिटर तर म्हशीचे 50 लिटर निघते. या दुधाची विक्री ते जवळच असलेल्या एका डेरीवर करत आहेत. सध्या गाईच्या दुधाला 35 रुपये लिटरचा भाव मिळत आहे. तर म्हशीच्या दुधाला 40 ते 50 रुपये लिटरचा भाव मिळतोय. या दुधातून महिन्याला ते दीड लाख रुपयांचा उत्पन्न घेत आहेत. मजूर, जनावरांचा चारा आणि त्यांच्या देखरेखीचा खर्च वगळता महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपये या व्यवसायातून मिळवत आहेत.

Also Read  After CSK's victory, there was a big change in the points table of IPL 2023.

दुभत्या जनावरांना दिवसातून दोन वेळा खुराक 

सुरुवातीला चंद्रसेन पारखे यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांच्या दोन भावंडांनी देखील यामध्ये त्यांना मदत करायला सुरुवात केली. जनावरांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन केलं. दूध वाढीसाठी या जनावरांना हिरवा चारा, गोळी पेंड त्याचबरोबर मका यासारखा खुराक या दुभत्या जनावरांना दिवसातून दोन वेळा दिला जातो. पारखे यांच्याकडे कोरडवाहू शेती असल्याने हिरवा चारा त्यांना विकत घ्यावा लागतो. तर यापासून ते कमी पैशांमध्ये मूरघास तयार करतात. त्यामुळं जनावरांना बाराही महिने चारा उपलब्ध होतो. हा व्यवसाय वाढवण्यासाठी तिघेही भावंड वेळ मिळेल तसा या मुक्त गोठ्यात काम करत असतात.

बीड तालुक्यातील तरुणांचा दुग्ध व्यवसायाकडे कल वाढला

बीड जिल्ह्यामध्ये आष्टी आणि कडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतलं जातं. आता बीड तालुक्यातील अनेक तरुणही दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. शेती बरोबरच त्याला पूरक असलेल्या दुग्ध व्यवसायाचे योग्य नियोजन केले तर त्यातूनही चांगले पैसे मिळू शकतात. त्यामुळं बीड जिल्ह्यातील अनेक तरुण शेतकरी आता या दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुलं आज शिक्षणासाठी शहरात जात आहेत. शहरांमध्ये शिक्षण घेता येत खरं मात्र शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी लागेल याची शाश्वती नाही. मात्र, ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन काही ना काहीतरी असतेच. त्याच जमिनीतून जर शेतीपूरक व्यवसाय केला तर त्यातून नोकरदारा इतका पगार पाडता येऊ शकतो हेच चंद्रसेन पारखे यांनी दाखवून दिलं आहे.

Also Read  Yavatmal: फणस शेतीतून साधलीय आर्थिक उन्नती, विदर्भातील शेतकऱ्याने घेतलं लाखोंचं उत्पन्न

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : श्रीगोंदा तालुक्यातल्या युवा शेतकऱ्यानं केली पिवळ्या कलिंगडाची लागवड, शहरी भागात मोठी मागणी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?